सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रशासकीय आढावा बैठकीस राजकीय कार्यक्रमाचे स्वरूप उपस्थित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी भाजपाची मागणी

सरपंच व उपसरपंच परिषदेच्या नावाखाली रेणापूर येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवेश करून राजकीय भाषणे झाली या बैठकीस राजकीय स्वरूप देण्यात आले होते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

s.ranjankar
  • Aug 5 2021 6:52PM

 

रेणापूर : सरपंच व उपसरपंच परिषदेच्या नावाखाली रेणापूर येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवेश करून राजकीय भाषणे झाली या बैठकीस राजकीय स्वरूप देण्यात आले होते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कार्यवाही करावीअशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ सरवदे यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे कीबुधवार दि.४ ऑगस्ट रोजी रेणापूर येथे स्थानिक आमदारांनी सरपंच व उपसरपंच परिषदेच्या नावाखाली आढावा बैठक घेतली. या बैठकीस सर्व विभागप्रमुखजि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीउपविभागीय अधिकारीतहसीलदारगटविकास अधिकारीग्रामसेवकतलाठीकृषी सहाय्यकनगरपंचायतचे मुख्याधिकारी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  या बैठकीच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची छायाचित्रे होती. प्रशासकीय आढावा बैठक असताना  काँग्रेस पक्षाचे पुढारीचेअरमन व इतर अनेक जण व्यासपीठावर बसलेले होते. या बैठकीत राजकीय भाषणे झाली तसेच पक्ष प्रवेशाचे कार्यक्रमही घेण्यात आले. यावरून ही आढावा बैठक होती की राजकीय मेळावा असा प्रश्न निर्माण होत आहे एकूणच काँग्रेस पुढाऱ्यांनी आढावा बैठकीत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार केला आहे. अशा राजकीय स्वरूपाच्या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती का दर्शवली आढावा बैठकीत राष्ट्रीय कार्यक्रम करण्यास पाठिंबा कशासाठी दिलाकुठल्या शासन निर्णयाच्या आधारे प्रशासनाने हा कार्यक्रम राबवला असे प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत.  सत्तेचा दुरुपयोग करण्याचा हा प्रकार असून भाजपाच्या वतीने या कार्यक्रमाचा निषेध करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असून अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावीअन्यथा भाजपाच्या वतीने न्यायालयीन न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

         या निवेदनावर ॲड.दशरथ सरवदे यांच्यासह पक्षाचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसेमराठवाडा ओबीसी प्रमुख डॉ. बाबासाहेब घुलेपंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणेउपसभापती अनंत चव्हाणरेणापुरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे,  सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकरनगरसेवक उज्वल कांबळेपंचायत समिती सदस्या सौ.चंद्रकला इंगोलेचंचनाबाई घुलेबायनाबाई साळवे यांच्यासह नगरसेविका सुरेखा चव्हाणविजय चव्हाणसुमन मोटेगावकरराजेश घोडकेसंतोष चव्हाणकिसन क्षीरसागरप्रविण शिंदेप्रशांत डोंगरेविजय गंभीरेमहेंद्र पाटीलराज जाधवनवनाथ मानेधनंजय पवारपाटलोबा मुंडेगोविंदराव सूर्यवंशीसौदागर कुंभारउद्धव घोडकेज्ञानेश्वर घोडकेविठ्ठलराव कसपटेदत्ता सरवदेसुभाष पवारकेशरबाई राठोड व असंख्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार