सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कष्टाने संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांचा सत्कार..

बुलढाणा : आज ८ मार्च या दिवशी जगभरात जागतिक महिला दिवस साजरे करण्यात येते

Sudarshan MH
  • Mar 9 2021 6:21AM
 
(योगेश शर्मा)
बुलढाणा : आज ८ मार्च या दिवशी जगभरात जागतिक महिला दिवस साजरे करण्यात येते. तर भारतात १९७५ पासून या दिवसाला मोठ्या प्रमाणात साजरे करणे सुरू झाले. मागील वर्षभरापेक्षा अधिक काळ हा कोरोनाच्या सावटाखाली गेले असून त्याचे परिणाम दिवसागणिक वाढतच असल्याचे चित्र समोर येत आहे. आणि याच काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांची अवस्था पार बिकट झाली असून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे सुद्धा जड जात असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. परंतु या कठीण काळातही महिला आपल्या कुटुंबाच्या पालनपोषण करिता आपल्या आरोग्याची सुद्धा पर्वा न करता दिवसरात्र छोटे मोठे काम करत कुटुंबाचा गाडा हाकलत आहे. अश्या कष्टाने संसाराला हातभार लावणाऱ्या महिलांचा आज जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही त्यांना गुलाब पुष्प देत त्यांचा सत्कार केल्याची प्रतिक्रिया रा.म.कॉ. च्या जिल्हाध्यक्षा प्रा. अनुजा सावळे यांनी दिली आहे.
आज दिनांक ८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा बुलडाणा च्या वतीने ज्या कर्तबगार महिला कोरोना काळातही कष्टाने संसाराला हातभार लावतात अश्या भाजी विक्रेत्या, फरसान, फळ विक्री करणाऱ्या महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.अनुजा सावळे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस बुलडाणा,
सौ.लक्ष्मी शेळके मा. जि.प.सभापति, 
सौ. निर्मला तायडे ता.उपाध्यक्ष,
नाझिमा खान शहराध्यक्ष,
तथा सौ.जगताप, सौ .दैवत व इतर महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती .यावेळी महिला स्वाभिमान सर्वांनी जपण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. सौ. अनुजा सावळे पाटील यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार