सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंत्यदर्शन

महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे मुळगाव नांदेड जिल्ह्यातील देवाची वाडी हे असून मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्ष होते

Deepak Chavhan
  • Oct 9 2022 12:32PM
नाशिक -  भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज आज पहाटे निधन झाले. श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरूकुल सेवा संघ त्र्यंबकेश्वर येथेआज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे येथेअंत्यदर्शन घेतले.

यावेळी बंदरे व खनिकर्म तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिशा मित्तल, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, तहसिलदार दिपक गिरासे,  प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे मुळगाव नांदेड जिल्ह्यातील देवाची वाडी हे असून मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्ष होते. त्र्यंबकेश्वर येथील २००३ व २०१५ सालच्या कुंभमेळाचे ते अध्यक्ष होते. भारतात सर्व ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यात महाराजांचा सक्रीय सहभाग होता. संत गाडगे महाराज यांचा सहवासात त्यांनी काही दिवस वास्तव्य केलेले होते. महंत सागरानंद सरस्वती महाराज हे त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे गेल्या २५ वर्षापासून अध्यक्ष होते.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार