सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिक येथे आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या एक उच्चशिक्षित विवाहित महिलेचे एक महिला पोलिसांनी वाचवले प्राण!

कर्तव्यदक्ष युनीट 1च्या ट्रॅफिक महिला पोलिसांची कामगिरी,

Abhimanyu
  • Oct 15 2021 12:04AM

प्रतिनिधि:-नाशिक

नाशिक येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान एक उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहीत तरुणी मानसिक स्थितीत अस्तिर असल्याने ,रामवाडी च्या पुलावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना तिला महिला पोलीस हवालदार रोशनी भामरे यांनी जीवाची बाजी लावून गोदावरी नदीत  उडी मारण्याच्या प्रयत्नात असतांना,  उडी मारण्या पूर्वीच पोलीस रोशनी भामरे यांनी हाताने घट्ट धरून पुलाच्या कठड्यावरून खाली ओढून  महिलेस वाचविले, मात्र नेहमी प्रमाणे  बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी  होती.मात्र कर्तव्यदक्ष पोलीस रोशनी भामरे यांनी गर्दीत जाऊन सदर महिलेस वाचविले , व सरकार वाडा पोलिस्टेशन येथे घेऊन गेल्या.

सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधीक्षक सुनील जाधव यांनी या महिलेस मार्गदर्शन करून आपल्या मुलीच्या वयाची असल्याने घाबरलेल्या महिलेस धीर देऊन आपल्या मुली प्रमाणे त्या मुलीची विचारपूस करून  समुपदेश केला,तसेच माझ्या वयाची तुझ्या वयाची माझी मुलगी असल्याने यापुढे तू माझी मुलगी तेव्हा कुठलीही अडचण आल्यास तात्काळ येथे ये मी सदैव तत्पर आहे , असे सांगितले . सखोल चौकशी केली असता सदर महिला मानसिक रुग्ण असून सायकॅस्त्रिक ची उपचार चालू आहे.  ही महिला उच्चशिक्षित असून इंदिरानगर येथील रहिवासी आहे. तीच्या सासरच्या लोकांना बोलाउन समुपदेशन केले, 

कर्तव्यदक्ष युनीट 1 च्या ट्रॅफिक महिला पोलिसांची  कामगिरी,  वाचवले अनेक महिलांचे प्राण तसेच मागील पाच वर्षांपूर्वी धारणा नदीत पडलेल्या एका महिलेला टायर च्या साह्याने रोशनी भामरे यांनी वाचविले या रणरागिनी 11 ऑगस्ट 2019 रोजी अशाच रामवाडी येथील आत्महत्या साठी पाण्यात उडी मारलेल्या गोदावरी नदी तून पाण्यात पडलेल्या एका महिलेला एका महिलेस ओढणीच्या साह्याने वाचविले तसेच  पोटातील पाणी काढून,  कृत्रिम श्वासोच्छवास देऊन सदर महिलेस जीवदान दिले व नंतर  लीलावती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले .अनेक महिलांचे प्राण वाचविणारर्या या कर्तव्यदक्ष रणरागिनीचे सर्वत्र अभिनंदन केले  जात आहे. 

मागील महिन्यात विनयनगर येथील महिलेनं आपल्या लहान मुलीसह आत्महत्या केली होती, कोव्हिडं नंतर बऱ्याच लोकांची मानसिकता खराब होत आहे, तेव्हा मुख्यपोलीस निरीक्षक सुनील जाधव व कमिशनर ऑफ पोलीस दीपक पांडयेय यांनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.एका महिलेचा प्राण वाचविल्यानंतर घरातील तापदायक वातावरणातून मार्ग काढण्यासाठी सरकारवाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक व युनीट1 च्या पोलीस यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार