सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षकानी दाखवला बनावट दारूचा धंदा करणाऱ्यांना खाकीचा इंगा,कोट्यवधी रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त

कोट्यवधी रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त

Abhimanyu
  • Oct 14 2021 10:59AM

प्रतिनिधि:-भरत गोसावी नाशिक

नाशिक:- नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या खाकी स्टाईल ने बनावट दारूचा अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आसुन पोलिस अधिक्षक सचिन पाटिल यांनी स्वता सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसलेल्या चांदोरीत परिसरतील बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त करू  संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आसुन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वात हि मोठी कार्यवाही आसुन त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी खडक जागे झाल्याचे बघायला मिळाल आहे अधीक्षक पाटील यांनी केलेल्या कारवाईनंतर अगदी काही तासातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने सायखेडा परिसरात छापा टाकत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान,कारवाई झालेले दोन्हीही कारखाने हे  संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे आसुन उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सायखेड्यात छापा टाकला. दरम्यान, धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार दिनेश गायकवाड ऊर्फ दिनू डॉन हा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे येत आहे. 


पोलिस अधीक्षकांनी केलेल्या कारवाई बाबत मिळालेल्या माहितीनुसार चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. माहितीची खात्री करीत  पाटिल यांनी रात्री अकराच्या सुमारास पोलिस ताफा नेत छापा टाकला. घटनास्थळी संजय मल्हारी दाते (वय ४७, रा. गोंदेगाव, ता. निफाड, जि. नाशिक) मिळून आला.चौकशीत बनावट देशी दारूचे अंदाजे दोन हजार खोके, १५ हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, स्पिरिट अंदाजे २० हजार लिटर, २०० लिटर सुमारे १०० बॅरेल, रिकामी खोकी अंदाजे दहा हजार, देशी दारू बनविण्याचे साहित्य, पाण्याच्या टाक्या पाच व एक ट्रक, असा अंदाजे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्समध्ये सुरू असल्याचे चौकशीत समजून आले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आसुन या संपूर्ण रॅकेट मागे नेमका कोनाचा हात होता हि दारु नेमकी कुठे सप्लाय केली जात होती व या संपूर्ण रॅकेट कोनाच्या आशीर्वादाने चालू होते याची चौकशी पोलीस अधीक्षक सचिन पाटील व त्यांची टीम करीत आहे चुकीला माफी नाही पोलीस अधीक्षक सचिन पाटील.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार