सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिकमध्ये आहे अडीचशे वर्षांची रहाड्यात रंग खेळण्याची परंपरा; रहाडची प्रथा नक्की काय आहे?

नाशिकमध्ये रंगपंचमीची आगळीवेगळी परंपरा आहे. नाशिककर पेशवेकालीन रहाडीत धप्पा मारत रंगपंचमी साजरी करतात. या रहाडींचा अत्यंत रंजक इतिहास आहे.

Shruti Patil
  • Mar 30 2024 8:17AM

नाशिक: नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. सहा रहाडींमध्ये नाशिककर धप्पा मारुन रंगपंचमी साजरी करतात. नाशिकमध्ये अडीच शतकांपासून रहाड परंपरा चालत आली आहे. देशभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. मात्र सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

नाशिकमध्ये २५० वर्षांपासूनची रहाड परंपरा आजही कायम आहे. यावेळी नाशिक शहरातील तिवंधा चौक, शनी चौक, गाडगे महाराज पूल, जुनी तांबट गल्ली, बागवानपूरा, मधली होळी अशा सहा ठिकाणी रहाड रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. २५ बाय २५ फुटांचा चौरस आणि साधारणपणे १० ते १२ फुटांची खोली असलेल्या हौदात नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात आणि रंगपंचमीच्या दिवशी दुपारी २ वाजेनंतर या रहाडीची पारंपरिक पूजा करुन नाशिककर नागरिक या रहाडीत उडी मारुन रंगोत्सव साजरा करतात.

नाशिकमध्ये १८ व्या शतकात तब्बल १८ रहाडी अस्तित्वात होत्या. मात्र काळाच्या ओघात त्यातील काही बुजल्या गेल्या काही रहाडींवर वाडे बांधले गेल्यानं त्यांचं अस्तित्व नामशेष झालं. पण आता त्यातील प्रामुख्यानं पाच रहाडी रंगउत्सवा दरम्यान कार्यरत आहेत. तर नुकतीच जुने नाशिकच्या मधल्या होळीत सुरु झालेल्या मेट्रो सिटीच्या खोदकामादरम्यान सहावी रहाड मिळून आली. त्यामुळं आता नाशिकमध्ये सहा ठिकाणी रहाडीत रंग उत्सव साजरा होणार आहे.

दंडे हनुमान चौकातील रहाड - रंग पिवळा...

नाशिकमधील काझीपुरा पोलीस चौक परिसरात तीनशे वर्षांपूर्वीची पेशवे कालीन दंडे हनुमान रहाड आहे. पूर्वी येथे बैलगाडीवर मोठमोठे टीप, पाण्याच्या टाक्यातून, रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र कालांतराने ही परंपरा बंद पडली. त्यानंतर रहाड खोदण्यात येऊन रंगपंचमी साजरी केली जाते. या रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो. जवळपास २०० किलोहून अधिक फुलांना एकत्रित करून रंग तयार केले जातात.

तांबट लेनमधील रहाड - रंग केशरी...

पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात तयार केलेली ही रहाड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही रहाड दुर्लक्षित होती. तांबटलेनमधील युवकांनी एकत्र येत ही रहाड खुली केली आहे. या रहाडीचा रंग केशरी असतो. रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबीयांना पूजेचा मान दिला जातो. रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले तुळस, चंदनाचा वापर केला जातो. फुले कढईमध्ये उकळवली जातात. त्यानंतर पाण्याने भरलेल्या रहाडीत एकजीव केल्यानंतर रंग तयार होतो.

तिवंधातील रहाड - रंग पिवळा...

तिवंधा चौकात बुधा हलवाईच्या दुकानासमोर ही पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा आहे. हा रंग फुलांपासून बनवला जातो. रहाडीचा मान जळगावकर कुटुंबीयांना आहे. या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो. अर्धा भाग महिलांसाठी राखीव असतो तर अर्धा भाग पुरुषांसाठी राखीव असतो.

दिल्ली दरवाजा चौकातील रहाड - रंग केशरी...

गोदाकाठावरच्या गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात पेशवेकालीन रहाड आहे. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा रंग हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी आहे.रहाडीची देखभाल आणि मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. या रहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

शनी चौकातील रहाड - रंग गुलाबी...

पंचवटी परिसरातील शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. या परिसरात पेशव्यांचे सरदार वास्तव्यास होते. त्याकाळी ही रहाड कुस्त्या खेळण्याचा हौद होती. रास्ते सरदार या राहाडीची देखभाल करत असत, असे बोलले जाते. शनी चौकातील शनी चौक मित्र मंडळ आणि सरदार रस्ते आखाडा परंपरेने या राहाडीची आजतागायत जपणूक करत आहेत. या रहाडीचा रंग गुलाबी आहे. रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाडीची पूजा करतात. रहाड झाकण्यासाठी सागाच्या लाकडाच्या मोठ्या ओंडक्याचा वापर केला जातो. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार