सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारच्या सिद्धिविनायकाचा चमत्कार; वाचले अनेक प्राण

सुमारे अडीचशे वर्षे जुना भलामोठा वृक्ष

Nanurbar MH
  • Sep 26 2020 3:38PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - सुमारे अडीचशे वर्षे जुना भलामोठा वृक्ष कोसळून त्याखाली घर आणि मंदिर दबले गेले. मात्र ही दुर्घटना पहाटे घडल्याने झाडाखालील रेशनदुकानात आणि मंदिरात गर्दी करणाऱ्या लोकांच्या प्राणावर बेतलेला दुर्धर प्रसंग टळला. मंदिरातील सिद्धिविनायकाचीच ही कृपा असे मानून शेकडो लोकांनी आज तिथे घटना पाहायला गर्दी केली.
देव तारी त्याला कोण मारी, काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती; अशा कितीतरी म्हणींचे वाक्प्रचारांचे प्रत्यंतर देणारी ही घटना ठरली आहे. नंदुरबार शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धिविनायक चौक प्रसिद्ध आहे. या चौकात अडीचशे वर्षे जुने विशाल आकाराचे भलेमोठे चिंचेचे झाड असून या विशाल झाडाच्या खाली सिद्धिविनायकाचे अत्यंत जुने मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने या मंदिरात रोज शेकडो लोक दर्शनाला येतात. या मंदिरा शेजारीच रेशन दुकान असून सध्या धान्य घेण्यासाठी रोजच शेकडो ग्राहक गर्दी करत असतात. प्रमुख  वर्दळीचा रस्ता  असल्याने  बाजारहाट करणाऱ्यांची  सुद्धा  या भागात गर्दी असते. अशा ठिकाणचा हा भला मोठा वृक्ष आज पहाटे साडेतीन वाजता अचानक कोसळला. त्याच्या भल्यामोठ्या पसाऱ्याखाली दोन खोल्यांचे एक घर रेशन दुकान आणि मंदिर पूर्णतः दाबले गेले. घराच्या भिंती कोसळल्या परंतु कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंदिराच्या भिंतीचे नुकसान वगळता घुमट, गाभारा, मूर्ती सर्व सुरक्षित राहिले. सकाळी दर्शनार्थी लोकांनी गर्दी केली असता ही दुर्घटना त्यांना पाहायला मिळाली. तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चार-पाच तास उशिराने घटना घडली असती तर किती जीव गेले असते याचा अंदाज करवत नाही; असे म्हणून नागरिकांनी पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानले व सिद्धिविनायकाचा चमत्कार मानून कृतज्ञता व्यक्त करू लागले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार