सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चौथ्या हातमाग गणनेत समाविष्ट होण्याचे आवाहन

नंदुरबार दि. 8: चौथी राष्ट्रीय हातमाग गणना 2017 मध्ये अनावधानाने सुटलेल्या हातमाग तसेच विणकरांचा हातमाग गणनेत समावेश होण्यासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन प्रादेशिक उप आयुक्त सु.म.तांबे यांनी केले आहे.

Nandurbar MH
  • Sep 9 2021 11:04AM


नंदुरबार दि. 8: चौथी राष्ट्रीय हातमाग गणना 2017 मध्ये अनावधानाने सुटलेल्या हातमाग तसेच विणकरांचा  हातमाग गणनेत समावेश होण्यासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन प्रादेशिक उप आयुक्त सु.म.तांबे यांनी केले आहे.

या गणनेचे काम महाराष्ट्र राज्यात मे.कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हीस लि.हैद्राबाद संस्थेमार्फत पुर्ण झालेले असून हातमाग गणनेत समावेश न झालेल्या विणकरांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उपनिबंधक सहकारी संस्था तसेच सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून परीपूर्ण भरलेला अर्ज 10 दिवसाच्या आत प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601 (दूरध्वनी क्रमांक 022-25405363) येथे किंवा rddtextiles3mumbai@rediffmail. com या ई-मेलवर सादर करावे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार