सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

न्यूक्लिअस बजेट योजनेतंर्गत विविध योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार, दि. 6 : एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्गत सन 2021-2022 या वर्षांत केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट योजनातर्गत विविध योजनेचा लाभ

Nandurbar MH
  • Jan 6 2022 1:38PM


नंदुरबार, दि. 6  :  एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्गत सन 2021-2022 या वर्षांत केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट योजनातर्गत विविध योजनेचा लाभ देण्यासाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 19 जानेवारी 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.

या योजनेतंर्गत ‘अ’- गटात उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजनेत आदिवासी लाभार्थ्यांना बिगर यांत्रिकी नौका व ओढप जाळी खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. तर आदिवासी महिला बचत गटांना फुलवात बनविण्याचे मशिन खरेदी करण्यासाठी तसेच आदिवासी लाभार्थ्यांना प्लास्टीक कॅरेट खरेदीकरिता तीनही योजनेसाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल.

‘ब’-गट प्रशिक्षण योजनेअंतर्गत आदिवासी युवक युवतींना एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण देणे.तसेच आदिवासी युवक युवतींना संगणक टंकलेखन मराठी, इंग्रजीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

तर गट-‘क’ मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजनेतून आदिवासी लाभार्थ्यांना भजनी मंडळ साहित्य खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य देणे.व आदिवासी समाजातील पारंपारिक नृत्य पथकातील कलाकारांकरिता अर्थसहाय्य देण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,दारिद्रय रेषेचा दाखला, आधार कार्ड, रहिवास दाखला, बॅक पासबूक, अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभेचा ठराव, तसेच यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. 

योजनेच्या अधिक माहिती  व  अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि. नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार