सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा

नंदुरबार, दि. 2 : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा

Nandurbar MH
  • Dec 2 2021 1:09PM


नंदुरबार, दि. 2  :  कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी  हरभरा, रब्बी ज्वारी व गहू बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आले  असून  अनुदानित बियाण्यांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

  जिल्ह्यात हरभरा 1 हजार 318 क्विंटल, रब्बी ज्वारी 340 क्विंटल व गहु 804 क्विंटल इतके अनुदानित बिंयाण्याचे तालुका निहाय वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 10 वर्षे आतील प्रमाणित बियाणे हरभरा फुले विक्रांत, राजविजय 202, फुले विक्रमसाठी प्रति किलो 25 रुपये अनुदान ,रब्बी ज्वारी  फुले रेवती, फुले सुचित्रा साठी प्रति किलो 30 रुपये अनुदान तसेच ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा जॅकी 9218 साठी प्रती किलो 25 रुपये अनुदान तर गहु फुले समाधान, लोकवन व एच.डी. 2189 साठी 16 किलो प्रती अनुदान राहील. 

शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे महाबीज व राष्ट्रीय बिज निगम यंत्रणेकडील वितरकांमार्फत तालुकास्तरावर परमिटद्वारे वितरणाचे नियोजन करण्यात आले असून अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर  ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच लक्षांकपुर्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने शेतकरी निवडण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु असुन या अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार यांनी  केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार