सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन

नंदुरबार, दि. 24 : प्रजासत्ताक दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही

Nandurbar MH
  • Jan 25 2022 11:16AM


नंदुरबार, दि. 24 : प्रजासत्ताक दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही व राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता  नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

जनतेच्या वापरासाठी छोट्या कागदी राष्ट्रध्वजाचा उपयोग करण्यात यावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज संहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा. अशी विक्री होताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम 2 नुसार कार्यवाही करावी. सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि महामंडळांनी प्लॅस्टिक ध्वजाच्या वापरास पायबंद घालावा. 
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रजासत्ताक दिनाचा संपुर्ण कार्यक्रम सामाजिक अंतराचे नियम पाळून साजरा करावा. तसेच कोरोना विषाणूच्या संदर्भातील केंद्र व राज्य शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाने पालन करून संपन्न करावा, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार