सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लम्पी स्कीन संसर्ग केंद्रापासूनचा दहा किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

नंदुरबार, दि. 24 : शहादा तालुक्यातील मौजे कर्जोत, गोगापूर, तितरी, डामरखेडा, शिरुड, मोहिदा, मुबारकपूर, टेंभा, शेल्टी, सोनवद, असलोद, बामखेडा, श्रीखेड, बिलाडी व म्हसावद येथील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसिज

Nandurbar MH
  • Sep 25 2021 1:38PM

नंदुरबार, दि. 24 : शहादा तालुक्यातील मौजे कर्जोत, गोगापूर, तितरी, डामरखेडा, शिरुड, मोहिदा, मुबारकपूर, टेंभा, शेल्टी, सोनवद, असलोद, बामखेडा, श्रीखेड, बिलाडी व म्हसावद येथील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसिज या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील अन्य ठिकाणी होवू नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार  संसर्ग क्षेत्रापासून दहा किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन 10 किलोमीटर परिघातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाने  कार्यवाही करावी.

बाधित क्षेत्रभोवतालातील पाच किलोमीटर परिघातील जनावरांना गोट पॉक्स 100 टक्के रिंग स्वरुपात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील संबंधित संस्था प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, शहादा  व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, शहादा यांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी करावा. जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसिज रोग बाधित परिसरातील 5 किलोमीटर परिघातील गावांमध्ये रोग प्रतिबंधक उपाययोजनांचा अहवाल सादर  करावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार