सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हत्तीरोग दुरीकरण मोहिमेंतर्गत नवापूर तालुक्यात सर्वेक्षण

नंदुरबार, दि. 23 : हत्ती रोगाच्या दुरीकरणासाठी हत्ती रोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण नवापूर तालुक्यातील निश्चित केलेल्या गावांमध्ये 27 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणार आहे.

Nandurbar MH
  • Sep 24 2021 3:00PM


नंदुरबार, दि. 23 : हत्ती रोगाच्या दुरीकरणासाठी  हत्ती रोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण नवापूर तालुक्यातील निश्चित केलेल्या गावांमध्ये 27 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणार आहे.  

या सर्वेक्षणासाठी तालुक्यातील शासकीय निकषांनुसार निवडलेल्या 43  गावांतील 6 ते 7 वर्षे वयोगटातील 1 हजार 540 व्यक्तींचे  रक्त नमुना तपासणी करण्यात येणार आहे. हत्तीरोग हा बुचेरेरिया बॅनक्रॉफ्टी  या परोजपजीवी जंतूमुळे होणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार क्यूलेक्स प्रकारच्या डासामुळे होतो. दूषित डास मानवाला चावा घेताना हत्ती रोगाचे जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले असून जनजागृतीही करण्यात येत आहे. ही मोहीम यशस्विरीत्या राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार