सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अवसायकांचे पॅनेलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार, दि. 1 : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार अवसायक नियुक्तीसाठी अवसायकांचे पॅनेल

Nandurbar MH
  • Dec 1 2021 11:41AM


नंदुरबार, दि. 1  :  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार अवसायक नियुक्तीसाठी अवसायकांचे पॅनेल (नामतालिका) तयार करण्यासाठी 14 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.

 अवसायकांचे नामतालिकेसाठी  न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग वकील, चार्टंड अकॉऊन्टंट (सी.ए), इन्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲन्ड वर्कस अकॉऊन्टंट (आय.सी.डब्ल्यू ए), कंपनी सेक्रेटरी (सी.एस), तसेच राष्ट्रीयकृत ग्रामीण, भूविकास, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,व्यापारी,नागरी सहकारी बँक,राज्य सहकारी बँक याचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी, सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग 1 , वर्ग 2 अधिकारी सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी,महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती, सहकार संस्थेचे लेखापरीक्षण केले असल्याचे 10 वर्षांचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक यासाठी अर्ज करु शकतात.

 अवसायकांचे नामतालिकेसाठी अर्जदाराकडे पुढील अर्हता असावी, वयोमर्यादा 70 वर्षपर्यंत असावी, शारीरीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. सदर अर्जदारावर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी असल्यास त्यांची कोणतीही खातेनिहाय चौकशी चालु नसावी, तसेच सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. प्रॅक्टीसिंग वकील व चार्टंड अकॉऊन्टंट, कॉस्ट अकॉऊन्टंट,कपंनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेतील 5 वर्षांचा अनुभव असावा.अर्जदार कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा.  तसेच सदर व्यक्तींचा सहकार खात्या काळया यादीत समावेश नसावा. सदर व्यक्ती संबंधित विभागाच्या विभागीय सहनिंबधक,सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. अर्जदार एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकतो.

विहीत नमुन्यातील अर्ज 1 डिसेंबर 2021 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्हा उपनिंबधक,सहकारी संस्था, नंदुरबार खोली क्रमांक 228, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकरतलाव रोड, नंदुरबार (02564-210023) येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. अर्जाची छाननी 31 जानेवारी 2022 रोजी पूर्ण करुन 14 फेब्रुवारी 2022 पर्यत प्रारुप नामिका प्रसिध्दी करण्यात येईल. 28 फेब्रुवारी 2022 रोजी हरकती मागविणे तर 14 मार्च 2022 रोजी हरकतीवर निर्णय घेवून 21 मार्च 2022 रोजी अंतिम नामतालिका प्रसिध्दी करण्यात येईल. असे सहायक निंबधक सहकारी संस्था, निरज चौधरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार