सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दुधाळ जनावराचे गट वाटपासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार, दि. 12 : केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत सन 2021-2022 वर्षांसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय

Nandurbar MH
  • Jan 13 2022 10:21AM


नंदुरबार, दि. 12 : केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत सन 2021-2022 वर्षांसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा कार्यक्षेत्रातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

या योजनेसाठी दिव्यांग, विधवा,  परितक्त्या स्त्रिया, अल्प भूधारक, महिलांना प्राधान्य देण्यात येईल. अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://nah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईलवर AH-MAHABMS गुगल प्ले  स्टोअरवर 14 ते 23 जानेवारी 2022 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये. 

योजनेबाबत अधिक माहितीसाठी 02564-210016 किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार