सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पशुपालक शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड पशुसंवर्धन विभाग व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे विशेष मोहिमेचे आयोजन

नंदुरबार, दि. 12 : नंदुरबार जिल्ह्यातील पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या संयुक्त विद्यमाने 15 फेब्रुवारी 2022

Nandurbar MH
  • Jan 12 2022 11:57AM


नंदुरबार, दि. 12  : नंदुरबार जिल्ह्यातील पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या संयुक्त विद्यमाने 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत किसान क्रेडिट कार्ड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

केंद्र सरकार व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत दुग्ध व्यावसायिक, शेळीपालक अथवा कुक्कुट पालन करणारे पशुपालक ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, अशा जिल्ह्यातील 7 हजार 702 एवढ्या पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

ज्या पशुपालकांकडे शेती असेल त्यांच्याकडील किसान क्रेडीट कार्डची पतमर्यादा वाढवून मिळेल. परंतु व्याज सवलत फक्त 3 लक्ष पर्यंतच्या कर्जासाठी राहील. कर्जाकरीता व्याज सवलत दर 2 टक्के राहील, तर वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ देण्यात येईल. ही योजना पशुपालनासाठी खेळते भांडवल उपलब्ध होणे करता असून, एका गायीस 12 हजार रुपये, एका म्हशीसाठी 14 हजार रुपये, शेळी गट 10+1 करीता 12 हजार 500 रुपये ते 20 हजार रुपये, तर 100 ब्रॉयलर कुक्कुट पक्षी करीता 8 हजार रुपये, लेयरसाठी 15 हजार रुपये आणि गावठी पक्षांकरीता 5 हजार पर्यंत खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. हे खेळते भांडवल जनावरांचे पशुखाद्य, औषध उपचार तसेच विमा आणि तत्सम खर्चाकरीता उपलब्ध होणार असून यामुळे पशुपालकाला आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यासाठी हातभार लागणार आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत 600 अर्ज प्राप्त झाले असुन त्यावर जिल्हा अग्रणी बँकेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. 

 सर्वसाधारणपणे कोणत्याही तारणाशिवाय पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा (खेळते भांडवल) रु.1 लाख 60 हजार आहे. परंतु जो पशुपालक शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूध संघ, दूध उत्पादक कंपनीशी संलग्न आहे आणि कर्ज परत करण्याचा त्रिपक्षीय करार (दूध सोसायटी, संघ, बँक आणि पशुपालक) करुन कर्ज परत करण्याची हमी देत असेल त्यांना कोणत्याही तारणाशिवाय 3 लाख रुपयांच्या मर्यादेत पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरीता नसून त्यांच्या व्यवस्थापनातील खर्चासाठी आहे. योजनेची अधिक माहिती व अर्ज नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभाग अथवा जवळच्या बँक शाखेत उपलब्ध आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार