सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन

नंदुरबार दि. 11 : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र मिरज संस्थेमार्फत सन 2021-2021 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Nandurbar MH
  • Aug 11 2021 5:58PM


नंदुरबार  दि. 11 : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र मिरज संस्थेमार्फत सन 2021-2021 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या संस्थेमार्फत किमान आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) आणि किमान नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटार ॲण्ड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स ) करिता प्रवेश दिला जातो.

प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असून प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय राहील. अद्ययावत परीपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेट आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना समाज कल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यात येईल. 

प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता.मिरज, जि. सांगली पिनकोड 416410 (दूरध्वनी क्रमांक 0233-2222908) येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त दिव्यांगानी या योजनेचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या अधिक्षकांनी कळविले आहे. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार