सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

नंदुरबार, दि. 11 : जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली.

Nandurbar MH
  • Jan 12 2022 11:41AM


नंदुरबार, दि. 11 : जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. बैठकीस आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अशासकीय सदस्य डॉ.कांतिलाल टाटिया, डॉ. स्वप्नील बैसाणे, हरी पाटील आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. गावित म्हणाल्या, ‘हर घर नल हर घर जल’ योजनेतंर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या 100 टक्के घरांना शुद्ध पाणी देण्यासाठी जिल्ह्यातील 575 ग्रामपंचायतीकरीता 1658.34 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याने नागरिकांना शुध्द पाणी देण्यासाठी  प्रत्येक घरापर्यंत नळ कनेक्शन देण्याचे नियोजन करावे. योजना राबविताना कामे दर्जेदार करावीत. जलजीवन मिशनअंतर्गत कामे झालेल्या गावाची माहिती उपलब्ध करुन घ्यावीत, असे त्यांनी सांगितले. अशुध्द पाण्यामुळे अनेक आजार होत असल्याने  ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना सुरु आहे अशा ठिकाणी भूजल सर्व्हेक्षण विभागाने बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे का याची पडताळणी करावी. 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय व गटारीचे  कामे पूर्ण करावीत.  वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ न घेतलेल्यांना शौचालये देण्यात यावीत. शौचालयाचा लाभ देण्यासाठी पुर्नवसन गावाचे 100 सर्व्हेक्षण करावेत. लघु पाटबंधारे विभागाने पाझर तलावांचे कामे दर्जेदार करावीत. शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना विषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.  कांदा, मिरची, आंबा, सिताफळ तसेच इतर पिकांचे बीमा योजनेत समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्याची कामे त्वरीत पुर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोळदा गावालगतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीची कामे करावीत.

बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,रस्ते, सिंचन तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार