सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*विरचक धरणा लगत थडग्याचा अनधीकृत बांधकामविस्तार; अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज*

नंदुरबार- विरचक धरणालगतच्या जमिनीवर एका थडग्याचे बांधकाम अनधिकृतपणे वाढवण्यात आले असून या बांधकामाची चौकशी होणे आवश्यक आहे.

Nandurbar MH
  • May 23 2021 8:20PM
सुदर्शन न्युज - केतन रघुवंशी (नंदुरबार)
नंदुरबार- विरचक धरणालगतच्या जमिनीवर एका थडग्याचे बांधकाम अनधिकृतपणे वाढवण्यात आले असून या बांधकामाची चौकशी होणे आवश्यक आहे. धार्मिक स्थळाच्या नावाखाली धरणालगतची शेकडो स्क्वेअर मीटर जमीन गिळंकृत करण्याचा हा डाव आहे; असे स्थानिक ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. यामुळे धार्मिक वादाला कारणीभूत ठरण्याआधीच हे बांधकाम थांबवले जाणे अपेक्षित बनले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विरचक धरणाच्या पाणीसाठ्या पासून अवघे 50 फूट अंतरावर हे अवैध बांधकाम चालू आहे. वास्तविक पाहता कोणत्याही बांध अथवा डेम पासून 200 mtr अंतरापर्यंत कसलेही कच्चे अथवा पक्के बांधकाम करणे कायदेशीर गुन्हा असतो , तरी संबंधित विभाग काही अघटित घडण्याची वाट पाहत आहे काय असा सवाल सुदर्शन न्युज करीत आहे, कारण काही दिवसापूर्वी त्या जागेवर थडगे बसवण्यात आले. कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने नंतर भोवतालच्या जागेची साफसफाई करणे, पडीत जागा चांगली करणे असे सुरू झाले. काही दिवस गेल्यावर पांढरा रंग फासून त्याला धार्मिक ठिकाणाचे स्वरूप देण्यात आले. आता अचानक ग्रामस्थांना त्या जागेवर भिंती उभारलेल्या दिसू लागल्या आहेत. अचानक भिंतीचे बांधकाम कसे काय करण्यात आले? हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. कालांतराने धार्मिक स्थळाचे स्वरूप देऊन येथे उरूस वगैरेसारखे कार्यक्रम घेतले जातील आणि नंतर शेकडा स्क्वेअर मीटर जमीन अनधिकृतरित्या  गिळंकृत केली जाईल; अशी भीती ग्रामस्थांनी सुदर्शन न्युज कडे  माहिती देताना व्यक्त केली आहे. तथापि धार्मिक तेढ वाढू नये म्हणून अधिकाऱ्यांनी दखल घेणे अत्यावश्यक बनले आहे. संबंधित ग्रामपंचायत कडून किंवा महसूल विभागाकडून त्या जागेवरील अधिकृत व्यवहार झाले किंवा नाही? बांधकामाला परवानगी घेतली किंवा नाही? याचा तपास केला जाऊन जाहीर खुलासा केला जावा, तसेच हा लँड जिहादचा प्रकार असल्यास ताबडतोब पायबंद घातला जावा; अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केतन रघुवंशी, सुदर्शन न्युज नंदूरबार
84217 32333
96377 32333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार