सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरीट येथील महिलेच्या खून प्रकरणी आरोपी जेरबंद

नंदुरबार प्रतिनिधी तालुक्यातील कोरीट येथील महिलेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.

Nandurbar MH
  • Jul 6 2021 1:42PM

नंदुरबार प्रतिनिधी
तालुक्यातील कोरीट येथील महिलेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. मागील भांडणाच्या कारणावरुन त्याने हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे,
अधिक वृत्त असे की, दिनांक 3 जुलै रोजी कोरीट येथील उषाबाई हिरामण कोळी वय-46 रा. कोरी ह्या नेहमीप्रमाणे त्यांच्यास्वत:चे शेतात कामास गेल्या होत्या, परंतु संध्याकाळ होवूनही त्या घरी न आल्याने त्यांचे पती हिरालाल झुलाल कोळी  हे त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या शेताकडे गेले,मात्र त्या शेतात मिळुन आल्या नाही, त्यानंतर हिरालाल व कोरीट गावातील इतर ग्रामस्थांनी उषाबाई कोळी यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली असता रात्री 10 वाजता  शांतीलाल जतन कोळी यांच्या ऊसाच्या शेतात कोणी तरी  अज्ञात इसमाने उषाबाई कोळी यांच्या गळयावर, हातावर,मानेवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने उसाचे शेताच्या मध्यभागी फेकुन दिले होते. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी  सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन शेतात पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली,उसाचे शेताच्या मध्यभागी एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत निपचीत पडलेली आढळली. तसेच त्या महिलेच्या मानेवर, गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा दिसत होत्या.या बाबत मयताचे पती हिरालाल झुलाल कोळी 50 वर्ष  यांचे फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् खूनाचा गून्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार  विजय पवार  यांनी गून्हा उघडकिस आणण्यासाठी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. 
 घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 5-5 अमंलदारांचे 4 पथक तपासाठी रवाना करण्यात आले. 
 दिनांक 5 जुलै रोजी, घटनेच्या दिवशी ज्या उसाच्या शेतात मयताचा मृत्युदेह मिळुन आला ते शेत, जेथे तो मृत्युदेह पडलेला होता ती चारी व मयताला शेवटच्या वेळी पाहणारा हा एकच इसम आहे, तसेच तो त्या दिवशी टोकर (बांबु) तोडत होता, या मिळालेल्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आपल्या पथकास त्या संशयीत इसमास ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्याने,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयीत रामचंद्र नागु कोळी वय-39 रा. कोरीट  यास ताब्यात घेवुन विचारपुस केली, तसेच त्याला विश्वासात घेवुन त्याच्या काही विसंगत बाबी दाखविल्या असता संशयीत आरोपी रामचंद्र नागु कोळी याने मागील भांडणाचा राग मनात धरुन तसेच दिनांक 4 जुलै 2021 रोजी झालेल्या भांडणाचा रागातुन तिचा धारदार हत्याराने खून केल्याचे कबुल केले.
कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेतलेला आरोपी रामचंद्र नागु कोळी  यास गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी प्रभारी पोलीस अधिक्षक  विजय पवार,उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (गृह)  देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तात्पुरते प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस उप-निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार दिपक गोरे, रविंद्र पाडवी, महेंद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, जितेंद्र तांबोळी, सजन वाघ, मुकेश तावडे, विनोद जाधव, पुष्पलता जाधव पोलीस नाईक राकेश वसावे, बापु बागुल, दादाभाई मासुळ, सुनिल पाडवी, विशाल नागरे, राकेश मोरे, जितेंद्र अहिरराव, मोहन ढमढेरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, गोपाल चौधरी, मनोज नाईक, जितेंद्र ठाकुर, जितेंद्र तोरवणे पोलीस अमंलदार विजय ढिवरे, किरण मोरे, अभय राजपुत, आनंदा मराठे, शोएब शेख, राजेंद्र काटके, यशोदिप ओगले, तुषार पाटील, रमेश पाडवी, रमेश साळुंके, सतिश घुले, यांनी केली आहे,

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार