नंदुरबार : नवापूर शहरातील देवळफळी पेट्रोल पंपाजवळ आपसात हाणामारी करत आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे देवळफळी भागात भीती पसरली होती.देवळफळी पेट्रोलपंपाजवळ चैतन्य जयेश तांबोळी रा. मंगलदास पार्क, भावेश जिभाऊ भदाणे रा. लखानी पार्क राइल राजेंद्र कोली रा देवळफली व अविनाश जाधव रा. बजरंग चौक या चौघांमध्येही वादावादी व हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने याठिकाणी भेट दिली असता, चौघेही आपसात हाणामारी करत असल्याचे दिसून आले. दरम्यान चौघांनी मास्कचा वापर न करता शांततेचा भंग केला होता. याप्रकरणी पोलीस शिपाई विक्की वाघ यांच्या फिर्यादीवरुन चैतन्य, भावेश राहुल, अविनाश यांच्याविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333