सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परशुराम संस्कार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नंदुरबार : परशुराम संस्कार सेवा संघाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Nandurbar MH
  • Aug 2 2021 11:32AM


नंदुरबार : परशुराम संस्कार सेवा संघाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शहरातील गणेशनगर मधील समाज भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर पत्रकार राकेश कलाल, रवींद्र चव्हाण, परशुराम संस्कार सेवा संघाचे कार्यकारी अध्यक्ष तुषार उदारे, सचिव कमलेश पंडित, ग्रामीण अध्यक्ष योगेश कुलकर्णी, विवेक कुलकर्णी, संघटक अवधेश पंड्या,भूषण भट,संतोष देवळालीकर, खजिनदार मयूर कुलकर्णी, सहखजिनदार सुव्रत वाडेकर,आदी  उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप व गौरव करण्यात आला. समाजातील आपण काही देणे लागतो या भावनेतून परशुराम संस्कार सेवा संघाचे अध्यक्ष अरविंद विंगळे यांच्या पुढाकाराने दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आणि गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गणेशनगर परिसरातील नागरिक मोहन सोनार,राजेंद्र मिस्त्री,सौ भारती सूर्यवंशी, सौ. जोती शिरसाठ, सौ. कल्पना शिरसाठ,सौ. कल्याणी चौधरी, सौ. पूनम पिंगळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन परशुराम संस्कार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद विंगळे, सौ. आश्विनी विंगळे यांनी केले होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार