सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास विरोध करणारे खा. इम्तियाज जलील यांचा हिंदु सेवा सहाय्य समितीने केला निषेध

नंदुरबार: औरंगाबाद (संभाजीनगर) शहरात हिंदुस्थानचे आराध्य दैवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळा स्थापनेला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केल्यामुळे समस्त हिंदु समाजाचा भावना दुखावल्या गेल्याने हिंदु सेवा सहाय्य समितीकडून जाहीर निषेध

Nandurbar MH
  • Jan 24 2022 7:19PM

नंदुरबार: औरंगाबाद (संभाजीनगर) शहरात हिंदुस्थानचे आराध्य दैवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळा स्थापनेला  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केल्यामुळे समस्त हिंदु समाजाचा भावना दुखावल्या गेल्याने हिंदु सेवा सहाय्य समितीकडून जाहीर निषेध व्यक्त करून त्या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिले.
  निवेदनात पुढे म्हटले आहे की,  'पुतळ्याचे एक कोटी रुपये ग्रामीण भागात शाळा उभारण्यास करा, पण पुतळा उभारायचे असेल तर माझा ठाम विरोध आहे, असं इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध केला आहे. हिंदुस्थानात वीर महापुरुष महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळाऐवजी मोगल आक्रमणकारी यांचे पुतळे उभारायचे का? असा संतप्त सवाल हिंदु समाज इम्तियाज जलील यांना विचारत आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, क्षत्रिय राणा राजपूत समाज समितीचे चेतन राजपूत आदींचा स्वाक्षरी आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार