सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डॉ.एपीजे अब्दुल कलाम वाचनालयात वाचनप्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निंबन्ध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारोह संपन्न.*

निंबन्ध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारोह संपन्न.

Nandurbar.MH
  • Oct 18 2020 2:38PM
सुदर्शन न्युज नंदुरबार
     नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील डॉ.एपीजे अब्दुल कलाम वाचनालयात वाचनप्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निंबन्ध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्राचे कक्ष अधिकारी मा.श्री.अर्षं कौशिक साहेब तसेच अध्यक्ष म्हणून युनियन बँकेचे मॅनेजर मा.श्री.मनीष सोनार साहेब, मा.श्री.दिलीप माळी, मा.श्री.भिमराव देवरे, मा.श्री.भिका माळी, मा.श्री.वंजी माळी, ई मान्यवर उपस्थित होते.
          दरम्यान मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमपूजन व पुष्पर्पण करण्यात आले, सत्कार समारंभ नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
          यावेळी अर्षं कौशिक साहेब म्हणाले," आजच्या युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी या प्रकारचे उपक्रम राबवणे हे गौरवाची गोष्ट आहे, वाचनालयाचे कार्य हे विधायक कार्य आहे." मनीष सोनार साहेब म्हणाले, "तरुण पिढीला उपयुक्त असे सर्व पुस्तके वाचनालयात उपलब्धत आहेत, वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी आज खूप प्रयत्न करण्याची गरज आहे, सुविधांचा विचार केला तर अभ्यास होणार नाही, त्यामुळे लक्ष सध्या करताना खाली बसून अभ्यास करावा लागला तरी चालेल."
         यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष जयेश देवरे यांनी वाचनालयाच्या उपक्रम, कार्याची माहिती सांगितली.
       संचालक शरद माळी यांनी वाचनालयाचे असलेले उद्धिष्ट सांगितले.
        मान्यवरांचा सत्कार पुस्तके, रुमाल, पेन व पुष्प देऊन करण्यात आला, कार्यक्रमात सोशल डिस्टन्स पाळण्यात आला होता. गेल्या 15 ऑक्टोबर पासून भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचा आज समारोप करण्यात आला. कार्यक्रमात एकूण 4 जणांना पारितोषिक व 30 जणांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद माळी प्रास्ताविक चेतन माळी तर आभार जयेश देवरे यांनी मानले, सागर माळी, योगेश माळी, चंद्रशेखर माळी, भारत माळी, योगेश माधव माळी, मयूर माळी यांनी सहकार्य केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार