सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा....

१७ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा....

Nandurbar MH
  • Oct 16 2020 11:05AM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार  दि. १४: हवामान खात्याने जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे व योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 खबरदारीची उपाययोजना म्हणून विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे.  मोकळया जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे.





आकाशात विजा चमकत असल्यास घरात‍ किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरात असताना आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरीत बंद करावे. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासुन दुर राहा. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.

या गोष्टी करू नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे असतांना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नका. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश

जिल्ह्यात १७ ऑक्टोबर पर्यंत विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुख्यालय सोडू नये. तसेच मंडळ निहाय पावसाचा व नुकसानीचा अहवालाची माहिती तालुका नियंत्रण कक्षात घ्यावी व दर दोन तासांनी जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी.

तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष २४ तास  कार्यरत ठेवावा. जिल्ह्यातील नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता लक्षात घेता  नदीकाठालगतच्या नागरीकांनी  सतर्क रहावे व योग्य दक्षता घ्यावी,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार