सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार एलसीबी पथकाने केला नाशिकच्या टोळीचा पर्दाफाश ऑनलाइन महागड्या वस्तू बुक करून लुटणारे अटकेत

तीन जणांच्या टोळीने महाराष्ट्राच्या विविध भागात महागड्या वस्तूंची

Nandurbar MH
  • Oct 13 2020 6:20PM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - तीन जणांच्या टोळीने महाराष्ट्राच्या विविध भागात महागड्या वस्तूंची ऑनलाईन बुकींग करून डिलिव्हरी बॉयला लुटण्याचा सपाटा लावला होता. मात्र सिनेस्टाईल कारवाई करीत नंदुरबारच्या एलसीबी पथकाने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
अटक केलेले तिनही संशयित आरोपी नाशिक जिल्ह्यातील आहेत. 
मुंबई, बदलापुर जि. ठाणे बिड,कोपरगांव जि. अहमदनगर, भुसावळ, चाळीसगांव जि. जळगांव,मनमाड जि. नाशिक येथे गुन्हे केल्याची माहिती या आरोपींनी दिली आहे. तसेच त्यांचेकडून अजून महाराष्ट्रातील इतर गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सचिन मच्छींद्र राठोड वय-२०, राहुल मच्छींद्र राठोड वय-१९ दोन्ही रा. तांडा पिंपरी हवेली पोस्ट परधाडी नांदगांव जि. नाशिक, सागर नवनाथ चव्हाण रा. मारवडी राजदेरे ता.चाळीसगांव जि. जळगांव असे तीनही संशयित आरोपींचे नाव सांगण्यात आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन राजेंद्र सपकार वय- २६ धंदा- खाजगी नोकरी रा- शिंदगव्हाण ता.जि. नंदुरबार यांची डिलीवरी डॉट कॉम नावाची कुरीयर सर्व्हिस आहे. त्यांच्याकडे दि.७ ऑक्टोबर २०२० रोजी मनिषा रा- छोरीया रेसिडन्सी नंदुरबार नावाच्या ग्राहकाने विवो मोबाईल एक्सप्रेस या साईडवरुन ४९,९८०/- रु किंमतीची एक वस्तु कॅश ऑन डिलेव्हरी मागविली. वस्तु डिलेव्हरी करण्यासाठी चेतन राजेंद्र सपकार यांनी ७८८७३८६८८० या क्रमांकवर फोन केला असता त्याने बाहेर असल्याचे सांगत नंदुरबार शहरातील खंडलेवाल टाऊन येथे मातोश्री बंगल्या समोर बोलाविले. चेतन सपकार हा पार्सल देण्यासाठी गेला असता तेथे थांबलेल्या
दोन जणांनी पैसे न देताच वस्तु हिसकावली व मागुन आलेल्या मोटार सायकलवर बसून तिन्ही जण पळून गेले. याविषयी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार केले.  महागडे पार्सल बुक करुन कॅश ऑन डिलीवरी करतांना डिलीवरी बॉयला लुटणे अशा पध्दतीचा गुन्हा नविनच होता. म्हणून प्रथम फिर्यादी चेतन सपकारच्या मोबाईलवर बुकींगसाठी आलेल्या नंबरचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक नांदगांव, मनमाड जि. नाशिक चाळीसगांव जि. जळगांव येथे रवाना केले. पथकाने वेशांतर करुन २ दिवस तपास केल्यावर संशयीत आरोपी हे नांदगांव शहरात ३ वेगवेगळ्या कंपनीचे पार्सल बुक करुन कुरीयर सर्व्हिसच्या डिलीवरी बॉयला लुटण्याच्या प्रयत्नात आहे असे समजल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकने स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा, नांदगांव परीसरात सापळा रचला. पथकातीलच एका कर्मचाऱ्याला डमी डिलीवरी बॉय बनवून पार्सल देण्यासाठी पाठविले. डमी डिलीवरी बॉयच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने संशयीत आरोपीतांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु फिल्मीस्टाईल झटापटी करुन तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक अशी माहिती समोर आली की, लॉकडाऊन काळात कामधंदा नसल्याने चोरी करण्याचे ठरविले व चोरी कशी करावी याबाबत त्यांनी युट्युबवर संपूर्ण माहिती घेतली. त्यानुसार त्यांनी पहिला प्रकार मुंबई येथे केला. त्यात ते तिन्ही यशस्वी झाले. त्यानंतर बदलापुर जि. ठाणे बिड, कोपरगांव जि.अहमदनगर, भुसावळ,चाळीसगांव जि. जळगांव येथे गुन्हे केल्याची माहिती दिली. संशयीत आरोपीतांना अधिक विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, ऑनलाईन गुगल मॅपद्वारे एखादे शहर निवडुन तेथील
श्रीमंत वस्तीमधील कोणत्याही एका श्रीमंत व्यक्तीच्या नावाने महागड्या वस्तु ऑनलाईन बुक करत असत. पार्सल घेतांना बोलण्यात गुंग करुन आलेले पार्सल इतर दोन आरोपीतांकडे द्यायचे. डिलीवरी बॉय पैसे मोजत असतांना पार्सलचे सिल अतिशय हुशारीने कापुन त्यातील महागडे पार्सल काढुन घेवुन त्यात साबन, दगड किंवा इतर वस्तु ठेवुन व्यवस्थित पूर्ववत बंद करून द्यायचे. मग पैसे नसल्याचे सांगून डिलीवरी बॉयला ऑनलाईन आलेले पार्सल परत करुन देत असत. एखाद्या वेळेस डिलीवरी बॉयला संशय आल्यास त्याचेशी झटापटी करुन तेथुन पळुन जाणे अशा प्रकारची नविन पध्द्त त्यांनी अवलंबली होती. तिन्ही आरोपीतांकडे स्वत:चे प्रत्येकी ५ ते ७ बनावट आधारकार्ड मिळून आलेले आहेत. त्याद्वारे ते प्रत्येक वेळी ऑनलाईन पार्सल बुक करतांना एक नविन सिमकार्ड खरेदी करुन त्या मोबाईल नंबरचा वापर ऑनलाईन पार्सल बुक करतांना करत होते. एखादी घटना केल्यानंतर आरोपी लागलीच सिमकार्ड तोडुन फेकुन देत असे. त्यामुळे अद्याप पावेतो त्यांच्यापर्यंत पोलीस पोहचू शकत नव्हते. परंतु नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अतिशय बारकाईने नविन पध्द्तीच्या या गुन्ह्याचा अभ्यास करुन आरोपीतांना ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपीतांचे शिक्षण १० वी पर्यंतच झाले आहे. सर्व पध्द्त त्यांनी ऑनलाईन यु ट्युबद्वारे शिकल्याचे सांगितले. 
त्यांचेकडुन नंदुरबार येथील गुन्ह्यात लुटण्यात आलेला ३०,९९९/- रु किंमतीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमंती एक दुचाकी मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली असून नांदगांव जि. नाशिक येथे गुन्हा करण्यासाठी आणलेली २ लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी सँट्रो कार , २१ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल, १६ हजार रुपये रोख अॅमेझॉन प्राईम कंपणीचे चिकट टेप, अॅमेझॉन प्राईम लिहीलेले ५ बॉक्स, रिन कंपणीचे साबन असा एकुण ३ लाख ६८ हजार ९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 
ही कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलस उप-निरीक्षक योगेश राऊत, पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक राकेश मोरे,पोलीस शिपाई विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.
------ अधीक्षक महेंद्र पंडित यांचे आवाहन--
नागरीकांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन पार्सल बुक करतांना स्वत:च्या नावाने बुक करा तसेच ऑनलाईन वस्तु बुक केलेली नसतांना कुरियर सेंटरमधुन कॉल आल्यास व एखाद्या एकांत ठिकाणी पार्सल घेण्यासाठी बोलविल्यास घेण्यासाठी जावु नका लागलीच संबंधीत पोलीस ठाण्याची संपर्क करुन घटनेची माहिती द्या. तसेच सर्व कुरियल सर्व्हिस सेंटर यांना देखील आवाहन करण्यात येते की, पार्सल डिलीवरी करतांना दिलेल्या पत्त्याची खात्री करुन मिळालेल्या पत्त्यावर घरी जावुनच पार्सल डिलीवरी करावी जेणेकरुन कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही. तसेच पार्सल बुक करतांना पार्सल बुक करणाऱ्या इसमाचे नांव गांव पत्ता आधारकार्डची छायांकीत प्रत, मोबाईल नंबर इ.माहिती घ्यावी तसेच काही संशयास्पद आढळुन आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. - महेंद्र पंडित (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, नंदुरबार

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार