सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यात गावठी बनवणाऱ्या 411 जणांवर गुन्हे दाखल

देशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारु बनवून

Nandurbar MH
  • Oct 7 2020 2:38PM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - देशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारु बनवून अवैध विक्री'' करणाऱ्यांविरोधात महिनाभर मोहीम राबवून नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने 411 जणांवर कारवाई करत 35 लाख 39 हजार 545 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून प्रसार होऊ नये म्हणून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. समुहाने एकत्रित येणे अवैध वाहतूक करणे यावर मनाई आदेश लागू करून नियंत्रण केले जात आहे. मात्र असे असतानाही जिल्ह्याच्या विविध भागात गावठी दारू बनवणारे गुत्ते चालू होते. देशी दारू बनवून त्याची अवैध विक्री आणि वाहतूक सुद्धा चालू होती. या अवैध धंद्याला दणका देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित  यांच्या मार्गदर्शनाखाली 30 ऑगस्ट पासून सप्टेंबर अखेरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात आली. जिल्हा पोलिस दलातील पथकांनी शोध घेऊन छापे टाकले. त्यात एकूण 415 पंधरा ठिकाणी कारवाई झाली. 411 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले तसेच 35 लाख 39 हजार 545 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार