सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महानिरिक्षकांच्या निर्धारानंतरही तस्करी थांबेना

दीड लाखाचा विमल साठा जप्त

Nandurbar MH
  • Sep 30 2020 6:08PM

नंदुरबार - येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अचानक कारवाई करून नवापूरमार्गे  मालेगाव कडे नेला जाणारा  सुमारे  दीड लाखाचा

  विमल गुटखा साठा  जप्त केला. गुजरात राज्यातून नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरमार्गे गुटका तस्करी करणाऱ्यांचे

नेटवर्क थांबता थांबायला तयार नसून पोलिसांपुढे त्यांचेेेे आव्हान कायम असल्याचे यावरून दिसत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार रोजी भल्या पहाटे गुन्हा अन्वेषण विभागाच्या  पथकाने नवापुर तालुक्यातील सुरत महामार्गावर

सापळा रचून एम एच 04 एफजे 5288 क्रमांकाची ट्रक अडवली. तिची तपासणी केली असता प्लास्टिक कचऱ्यातून लपवलेले सुमारे एक लाख 40 हजार रुपये किमतीचे

विमल गुटख्याचे पाकीट आढळून आले. तीन लाख रुपये किमतीचे अन्य सामान आणि ट्रक सह एकूण जप्त मुद्दे मालाची किंमत सात लाख रुपये सांगण्यात आली.

याप्रकरणी ट्रक मालक मोहम्मद रफीक मोहम्मद नासिर,रा.मालेगाव आणि ट्रक चालक तय्यब अली या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी नंदुरबार येथे एक आठवड्यापूर्वीच भेट दिली होती व गुटका रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा निर्धार व्यक्त केला

होता. परंतु पोलीस यंत्रणेच्या त्या सर्व प्रयत्नांना गुटखा तस्कर आणि त्यांचे छुपे साथीदार कसा हारताळ फासतात, हे पुन्हा पहायला मिळत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार