सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल मध्यरात्री एकला अपघाती निधन झाले

शिरपूर येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल अपघाती निधन झाले

Nandurbar MH
  • Sep 30 2020 11:56AM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार . धुळे 

शिरपूर ता.30 : येथील नगरसेवक तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे बुधवारी (30 सप्टेंबर) मध्यरात्री एकला अपघाती निधन झाले

. सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएमएस कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार

(एमएच 18 एएक्स 8) च्या इंजिनचा स्फोट झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना येथील

पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू केल्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले.
शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून गेले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे

अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष

आदी पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र,

माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार