सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार-केंद शासन तसेच राज्य शासनाने मराठा समाज आरक्षणाबाबत योग्य पाठपुरावा करुन मराठा समाजाला त्वरीत न्याय मिळवून द्यावा,

एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

Nandurbar MH
  • Sep 24 2020 11:21AM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ): नंदुरबार 

मराठा समाजाला न्याय 
द्यावा; अन्यथा आंदोलन छेडणार 
क्षत्रिय मराठा युवा सेनेचा इशारा 
नंदुरबार-केंद शासन तसेच राज्य शासनाने मराठा समाज आरक्षणाबाबत योग्य पाठपुरावा करुन मराठा समाजाला त्वरीत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन नंदुरबार तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्यामार्फत शासन-प्रशासनास देण्यात आले आहे. 
क्षत्रिय मराठा युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. राज्य सरकारने व्यवस्थित पाठपुरावा केला असता तर मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थिगिती मिळाली नसती. मराठा समाज आरक्षण बाबतीत विविज्ञ बदलणे, याबाबत आमची संभ्रमावस्था  झाली आहे. हा सर्व प्रकार मराठा समाजाचा विश्वासघात व फसवणूक करणारा आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत. आज मराठा समाजावर अन्याय झाला आहे. आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. तरी मराठा समाज आरक्षणाचा प्रश्‍न निकाली लागत नाही, तोपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कोणतीही नोकर भरती राबवू नये. याविषयी मराठत्त आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत. अन्यथा क्षत्रिय मराठा युवा सेना शासनाविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन पुकारेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेप्रसंगी क्षत्रिय मराठा युवा सेनेचे अध्यक्ष प्रविणदादा मराठे, ऍड.देवेंद्र मराठे, पप्पू मराठे, बंटी मराठे ,यशराज मराठे आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार