सुदर्शन न्युज : केतन रघुवंशी: नंदुरबार
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील अतिमहत्त्वाच्या प्रसंगाचे चित्र प्रदर्शन भाजपा जिल्हा कार्यालयात लावण्यात आले असून या चित्र प्रदर्शनाची पाहणी करताना भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री विजयभाऊ चौधरी, आमदार मा. श्री राजेश पाडवी, भाजपा संघटन सरचिटणीस श्री निलेश माळी, सरचिटणीस श्री राजेंद्र गावित,जिल्हा उपाध्यक्ष श्री आनंद सोनार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.