सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मा. पोलीस महानिरीक्षक याचा नंदुरबार जिल्हा दौरा, जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यांच्या सुळसुळाट, कर्तवयदक्ष पोलीस अधीक्षक सो. यांच्याकडून कार्यवाहीची अपेक्षा

मा. पोलीस महानिरीक्षक याचा नंदुरबार जिल्हा दौरा

Nandurbar MH
  • Sep 17 2020 6:39PM
 सुदर्शन न्युज  (केतन रघुवंशी ) : नंदुरबार - येथे रुजू झाल्यापासून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अस्सल पोलिसी खाक्या दाखवत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दोन नंबर वाल्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. परंतु आता हळूहळू सर्व पूर्वपदावर आलेले दिसत असून गुटका, सट्टा, जुगार, रेती तस्करी, रेशन तस्करी याबरोबरच दारू, लाकूड आणि गोमांस याची आंतरराज्यीय तस्करी प्रचंड तेजीत आलेली आहे. "सैंय्या भये कोतवाल तो अब डर काहे का?" अशा मानसिकतेत आलेल्या या दोन नंबर वाल्यांना धडा शिकवण्यासाठी नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव  दीघावकर नंदुरबार जिल्हा पोलिस दलाला विशेष कार्यादिशा देणार का? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर हे नुकतेच छेरिंग दोरजे यांच्या जागी नियुक्त झाले आहेत. त्यांनी नाशिक विभागाचा पदभार सांभाळल्यानंतर प्रथमच आज गुरुवार रोजी नंदुरबार येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. जिल्हा पोलीस दलाच्या कामाचा आढावा घेऊन नंतर काही पत्रकारांशी संवाद केला. जिल्ह्यात काही महिन्यांपासून अवैध धंद्यांच्या वाढता आलेख पाहता नवनियुक्त महानिरीक्षक यांनी अवैध धंद्यांचे कनेक्शन जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांना आधी वठणीवर आणावे ही नंदुरबार वासी यांची इच्छा आहे, कारण पोलीस दलातून छुपे संरक्षण मिळत आहे म्हणूनच नंदुरबार जिल्ह्यात सर्व प्रकारचे तस्करी फोफावली असून आंतरराज्य टोळ्यांचे नंदुरबार हे प्रमुख ठिकाण बनले आहे. सर्वात भीषण स्वरूप गुटका तस्करी, दारू तस्करीचे आणि गोमांस तस्करीचे आहे. या अवैध धंदेवाल्यांच्या ताटाखालचे मांजर बनून काम करणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी रोज उघडपणे या अवैध धंदेवाल्यांच्या सूत्रधारांपुढे सलामी ठोकायला जातात, असे लोकांमध्ये उघडपणे बोलले जात असते. गल्ली पातळीवर किंवा गाव पातळीवर काम करणाऱ्या साध्या कार्यकर्त्यांना सुद्धा हा आखो देखा हाल माहित आहे. असे असताना पोलीस दलाच्या नाशिक विभाग प्रमुखांच्या डोळ्यावर पट्टी बांधणारे राजकीय झब्ब्यातले दलाल वरचढ ठरतातच कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे वास्तव सांगायचे तर मध्यप्रदेशातून अवैधपणे येणारे दारूसाठे गुजरात राज्याच्या हद्दीत पोहोचवून देण्याचे प्रमुख केंद्र नंदुरबार बनले आहे. शहादा-धडगाव रोडवर हिमाचल प्रदेश, वेस्ट दिल्ली, कलकत्ता येथे निर्मित केलेल्या बनावट दारूचा कायम राबता असतो. नंदुरबार लगतच्या शहादा शिरपूर अक्कलकुवा नवापूर धडगाव या सर्व तालुक्यातील सीमावर्ती भागातून चोरटी वाहतूक होत असते. नंदुरबार शहरात डबल सीट दुचाकीवर नजर ठेवणारे किंवा ज्यादा प्रवासी घेऊन जाणाऱ्या काळीपिवळी वर नजर ठेवणाऱ्या जिल्हा पोलीस दलाच्या चाणाक्ष नजरेला ही वाहतूक कशी काय चकमा देते? हेे न उलगडलेले कोडे आहे. अधिकृत टॅक्स भरून दारू धंदा करणाऱ्या पेक्षा अवैध तस्करी करणाऱ्यांना संरक्षण व प्रसंगी स्क्वाडिंग देणारे अधिकारी हुडकून काढले जातील का? हा खरा प्रश्न आहे.पाळेमुळे रोवून बसलेल्या भ्रष्ट मनोवृत्तीला समुळ ऊपटून काढण्यासाठी काही बडे ऑपरेशन्स राबवण्याची आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाकडून याला अधिक प्राधान्य दिले जाणे नागरिकांना जास्त अपेक्षित आहे. लाखो रुपयाचा मद्यसाठा वाहनासह पकडल्याच्या कारवाया एरवी केल्या जात असतात. परंतु शहादा शहरातील भरवस्तीत चाललेला बनावट मद्याचा कारखाना वर्षानुवर्ष कोणाच्यातरी आशीर्वादाने चालत राहतो आणि स्थानिक पोलिस प्रशासनासह कोणताही अधिकारी दखल घेत नाही; हे मागे नाशिकच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर उघड झाले होते.
नंदुरबार जिल्ह्यात बिनधास्तपणे चालणारी गोवंशाची कत्तल आणि गोमांस तस्करी हा सुद्धा याहून भीषण प्रश्न आहे. उठता-बसता पोलिसांचे मक्कू घेणारा एक सेठ सर्व कसायांचे सेटिंग लावण्यात माहिर आहे. नंदुरबार शहरातील मोहल्ल्यामध्ये घराघरातून चालणारे अवैद्य कत्तलखाने या सेटिंग मुळेच आजही बिनबोभाट चालू आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा 2015 साली लागू करण्यात आला असतांनासुद्धा नंदुरबार जिल्ह्यात दररोज शेकडोच्या संख्येने गोवंशहत्या व गोवंश तस्करी केली जाते. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली होती त्या काळात सुद्धा हे अवैध आणि बेकायदेशीर प्रकार चालू होते. अलीकडेच पोलिसांनी मास जप्त करीत जे गुन्हे दाखल केलेत त्यावरूनच गोवंश कत्तल या जिल्ह्यात व शहरात किती भयंकर प्रमाणात चालते याचे दाखले स्वतः प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. वस्तविक गोहत्या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी; या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत. नंदुरबारच्या काही मोहल्ल्यांमधील घराघरातून अवैद्य कत्तलखाने चालवून गोवंश हत्या केली जात असल्याकडे जिल्हा प्रशासनाचे  व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदू प्रेमी संघटना आणि कार्यकर्त्यांनी वारंवार निवेदन  देऊन विधायक मार्गाने आंदोलने यापूर्वी केली आहेत. मात्र गौवंश हत्येचे जिल्ह्यातील प्रमाण बघता कार्यवाही अपुरी पडते. बहुतांश वेळेस गोरक्षकांनाच जीव धोक्यात घालून गोवंश कत्तल थांबवण्यासाठी संघर्ष करावा लागत असतो. कसायांच्या दलालांना गहाण पडणाऱ्या कार्यपद्धतीत बदल केला जावा हे लोकांना अपेक्षा आहे. मोजक्या पत्रकारांच्या गराड्यात बसून किंवा दलालांना शरण गेलेल्या धिकारी-कर्मचार्‍यांच्या तोंडची माहिती घेऊन नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षकांना खरी कार्यवाही साधता येणार नाही; असे निर्देशित करणारी ही स्थिती आहे. 
जिल्ह्यातील सर्वात जास्त बिकट परिस्थिती आज गुटका तस्करी ची राज्यव्यापी खहती आहे. गोमांस तस्करी हँडल करणारा दलाल सेठ यानेच गुटखा तस्करीत सुद्धा हातपाय पसरले आहेत. पक्षीय वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने त्याचे असे सर्व धंदे बिनबोभाट चालत आहेत. एका सिंधी व्यापार्‍याने गुजरात हद्दीवर वाढवलेले गुटखा तस्करी चे जाळे पेलून धरायला आता अनेक मान्यवर पुढे आले आहेत. पोलीस दल युवकांचे जीवन नासवणारे हे जाळे उद्ध्वस्त करू शकलेले नाही. नंदुरबार मधील राजकीय पदांचे आणि सामाजिक संघटनांचे आवरण घेऊन वावरणारे नामचीन लोक यात सहभागी आहेतच परंतु पोलीस दलातले महाभाग सुद्धा या व्यवसायाला संरक्षण देत आहेत असे सीमावर्ती भागात थोडी नजर ठेवल्यानंतर कोणालाही लक्षात येते. मग नाशिक विभागीय प्रमुख अधिकाऱ्यांना या गोष्टी खटकत का नाही? यावर कारवाई का होत नाही? गुजरात ची पासिंग असलेल्या दुचाकी धारक मजुरांना सीमेवरच दंड ठोकणारी ही मंडळी गुटका वाहणाऱ्या वाहनां समोर नेम्हळट का बनून जाते? हे सामान्य जनतेला सुद्धा माहित झाले आहे. तेव्हा या कार्यपद्धतीला वरपासून खालपर्यंत बदलवून खरोखरचे कायद्याचे राज्य आणले जावे ही लोकांना अपेक्षा आहे.
रेतीच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा देखील असाच गंभीर आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने तापी पात्रातून रात्रंदिवस अवैध उपसा केला जातो. नंतर रेतीचे तस्कर पोलिसांच्या नाकावर टिच्चून डंपरचे डंपर भरून रोज शेकडोच्या संख्येने वाहून नेत असतात. या
वाहनांमध्ये जालना, औरंगाबाद, नाशिक, सांगली, भिवंडी अशा अनेक जिल्ह्यातील वाहनांचा अधिक समावेश आहे. नंदुरबारची  रेती तस्करी  राज्यव्यापी असल्याचे  यातून ठळक होते. नंदुरबार जिल्ह्यातील तापी पात्रातून तसेच नजीकच्या गुजरात हद्दीतील  पत्रातून सुद्धा अनेक वर्षांपासून वाळूची तस्करी चालू आहे. अवैध वाहतुकीच्या मालट्रक्स नंदुरबार शहरातून दिवस-रात्र मोठ्या संख्येने धावत असतात. वेगाने धावणाऱ्या या गाड्यांमुळे अनेक अपघात होऊन काही जणांनी प्राण गमावले आहेत. लॉक डाऊन कालावधीतसुध्दा त्यात बदल घडला नाही. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र्र भारूड यांनी जिल्ह्याच्या हद्दीतून वाळूूूू वाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यााास बंदी घालणारा आदेश 29 जून 2020 रोजी जारी केला होता. सात दिवसाचे सात पथके नेमून कायम निगराणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु हे सर्व केवळ देखावे करणारे ठरले असून रेती तस्करी आजही निर्वेध चालू आहे. शेतकरी बेरोजगार युवक आणि भाजीपाल्या सारखा किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांच्या वाहनांना कारवाईचा दणका देणारे पोलीस वाळूचा डंपर सोडतात कसे? या विषयी जनतेच्या मनात संताप आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार