अश्लील मेसेज प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणांकडून ३० हजार रुपयांची वसुली
धमकी देऊन तरुणांकडून ३० हजार रुपयांची वसुली
अश्लील मेसेज प्रसारित करण्याची धमकी
देऊन तरुणांकडून ३० हजार रुपयांची वसुली
महिलेविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल
नंदुरबार- अश्लील मेसेज पाठवून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन एका महिलेने बोराळे गावातील एका तरुणांकडून ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की.तालुक्यातील बोराळे गावातील एका तरुणाला (३८) एका १९ वर्षीय महिलेने मोबाईलवर मेसेज पाठवला.त्यानंतर दोघांनी आपसात चॅटिंग करताना सदर महिलेने तरुणाला आपला सेक्सी फोटो पाठविण्यास सांगितले.यावर तरुणाने तु आधी तुझा फोटो पाठव नंतर मी माझा फोटो पाठवेल असे सांगितले. यानंतर सदर महिलेने तरुणाला फोन करून तुम्ही मला अश्लील मेसेज का करतात? असे धमकावून बोराडे गावाबाहेर नाशिंंदे रस्त्यावर भेटायला बोलावले.यानंतर तरुण सदर महिलेला भेटण्यासाठी गेला असता महिलेने तुम्ही मला अश्लील मेसेज का करतात? मी आता पोलिस स्टेशनला तुमची तक्रार करते.अशी धमकी दिली.यानंतर तरुणाने तु मला मेसेज केले मी नाही केले असे सांगितले.त्यावर मी मुलगी आहे.गावात व पोलिसांत तुझे कोणीही ऐकून घेणार नाही.जर तुला बदनामी मधुन वाचायचे असेल तर मला ५० हजार रुपये दे अन्यथा मी तुझी गावात आणि समाजात बदनामी करेल, अशी धमकी देऊन सदर तरुणांकडून ३० हजार रुपयांची खंडणी वसूल केली.सदर घटना दि. एप्रिल २०२१ रोजी घडली.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प