अलीसाहब मोहल्ला येथे दोन गटात तुफान हाणामारी, १४ जणांवर गुन्हा. गुरे बांधण्याच्या वादातून मारहाण
१४ जणांवर गुन्हा. गुरे बांधण्याच्या वादातून मारहाण
नंदुरबार- शहरातील अलीसाहब मोहल्ला येथे गुरे बांधण्याच्या वादातून दोन गटांत आपसात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.मारहाणीत ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून १४ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलीसाहब मोहल्ला येथे आरीफाबानो शब्बीर खान (२५) यांच्या घरासमोर त्यांचे गुरे बांधलेली असतात.दरम्यान परिसरात राहणारे नुसार नुरोद्दीन सैय्यद, जुनेद नुबाल सैय्यद, अर्शद नाबाद सैय्यद,सैफा सैय्यद,जियाउद्दीन सैय्यद,आकीब सैय्यद ( सर्व रा.अलीसाहब मोहल्ला) यांनी तुमचे गाई, बछडे येथुन काढून टाका.ही तुमच्या बापाची जागा नाही, असे बोलून वाईट शिवीगाळ करून आरीफाबानो शब्बीर खान, शबाना बानो, रज्जाक खान, रमजान खान, रियाज खान यांच्या अंगावर धावून आले.तसेच लाकडी दांडक्याने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्या घटनेत रहिम रज्जाक कुरैशी, रियाज रज्जाक कुरैशी, सलमान रज्जाक कुरैशी, युनुस रज्जाक कुरैशी, मोईन रज्जाक कुरैशी, रज्जाक शब्बीर कुरैशी,आरेफा शब्बीर कुरैशी,शबनम शब्बीर कुरैशी ( सर्व रा.अलीसाहब मोहल्ला) यांनी वरील कारणांमुळे अर्शद आली नुरोद्दीन सैय्यद (२७),सहेफोद्दीन रफियोद्दीन सैय्यद या दोघांना लाकडी डेंगाऱ्याने आणि लोखंडी पाईप ने मारहाण केली.आई नजमुन्नीस यांनाही मारहाण केली.त्यामुळे त्यांची सोन्याची चैन गहाळ झाली आहे.हातात कु-हाड घेऊन तुला गाई सारखे कापून मारुन टाकेल, अशी धमकी दिली.सदर घटना दि.१७ जुन रोजी ३ वाजता घडली.याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त�
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प