मोबाईलवर रोडाली लावल्याच्या वादातून एकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला
केलवापाणी येथील तिघांवर गुन्हा
केलवापाणी येथील तिघांवर गुन्हा
तळोदा - मोबाईलवर गाणे ( रोडाली) लावल्याच्या वादातून एकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची घटना केलवापाणी गावात घडली आहे.याप्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केलवापाणी येथील सिपा इरमा वळवी (४५) यांचा मुलगा वसंत वळवी याने आपल्या मोबाईलवर रोडाली लावुन तो मोबाईल ऐकत होता.दरम्यान यांचा राग आल्याने रवींद्र जालमसिंग पाडवी (२५) याने कुऱ्हाडीने सिपा इरमा वळवी यांच्या डोक्यात वार करून गंभीर दुखापती केले तर जलसिंग काकड्या पाडवी व अरविंद जलसिंग पाडवी यांनी त्यांना हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.सदर घटना दि.१४ जुन रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.याप्रकरणी सिपा इरमा वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि अमितकुमार बागुल करित आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प