सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.९७ टक्के लागला

शहादा तालुका ९६.१५ टक्के निकालाने आघाडीवर

Sudarshan MH
  • Jun 18 2022 6:13AM

नंदुरबार-  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल काल दि.१७ जुन रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला.यात नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ९४.९७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल ९६.१५ टक्के निकाल शहादा तालुक्याचा लागला आहे.तर नाशिक विभागात सर्वाधिक कमी निकाल नंदुरबार जिल्ह्याचा लागला आहे.तर रिपीटरचा निकाल ५९.२४ टक्के निकाल लागला आहे.

एस.एस.सी.बोर्डातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी चा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता आँनलाईन जाहीर करण्यात आला.सदर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी आपल्या मोबाईलवर व शहरातील विविध सायबर कॅफे मध्ये गर्दी केली होती. यात नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ९४.९७ टक्के लागला. नंदुरबार जिल्ह्यात २० हजार २५ विद्यार्थी परिक्षेत बसले होते.त्यापैकी १९ हजार १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात ९ हजार ९४९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पास झाले.७ हजार ३५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,१ हजार ५९७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ११८ विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक निकाल शहादा तालुक्याचा ९६.१५ टक्के लागला आहे.तर सर्वात कमी निकाल तळोदा तालुक्याचा ९०.८३ टक्के लागला आहे.

शहाला तालुका निकाल ९६.१५ टक्के

जिल्ह्यात सर्वाधिक निकाल शहादा तालुक्याचा ९६.१५ टक्के लागला आहे.तालुक्यात ५ हजार ४१ विद्यार्थी परिक्षेत बसले होते.त्यापैकी ४ हजार ८४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तळोदा तालुका निकाल ९०.८३  टक्के

जिल्ह्यात सर्वाधिक कमी निकाल ९०.८३ टक्के तळोदा तालुक्याचा लागला आहे.तालुक्यात १ हजार ८४७ विद्यार्थी परिक्षेत बसले होते.त्यापैकी १ हजार ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

अक्कलकुवा तालुका ९४.०६ टक्के निकाल

अक्कलकुवा तालुक्याचा निकाल ९४.०६ टक्के लागला आहे. तालुक्यात २ हजार ५२६ परिक्षेत बसले होते.त्यापैकी २ हजार ३७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

नवापूर तालुका निकाल ९५.५२ टक्के

नवापूर तालुक्याचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे.तालुक्यात ३ हजार ५७२ विद्यार्थी परिक्षेत बसले होते.त्यापैकी ३ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

धडगाव तालुका निकाल ९४.७८  टक्के

धडगाव तालुक्याचा निकाल ९४.७८ टक्के लागला आहे.तालुक्यात १ हजार ३४२ विद्यार्थी परिक्षेत बसले होते.त्यापैकी १ हजार २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार