डंपरची प्रवासी रिक्षाला धडक ६ जण गंभीर दुखापती
श्रावणी रेल्वे गेट जवळील घटना
नवापूर- खांडबारा गावाजवळील श्रावणी रेल्वे गेट जवळ भरधाव डंपरने प्रवासी रिक्षाला जोराची धडक दिल्याची घटना १७ जुन रोजी शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोगेगावहुन खांडबारा कडे प्रवासी रिक्षा येत असताना भरधाव डंपरने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये बसलेले सुरेश संजय गावीत, सविता अनिस वळवी,अनिस तिकडे (तिघे रा.जामदा), अमिरा दिनेश वळवी,भामटी अरविंद वळवी (दोघे रा.मौलीपाडा) व रिक्षाचालक असे सहा जण गंभीर दुखापती झाले आहेत.जखमींना खांबाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातस्थळी ग्रामस्थ व पोलिस यांनी मदतकार्य केले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प