चुलत भावाच्या लग्नाला गेल्याने एकाने केला पत्नीचा खून
तेलखेडी गावातील घटना धडगाव- चुलत भावाच्या लग्नाला गेल्याच्या रागातून एकाने
चुलत भावाच्या लग्नाला गेल्याने
एकाने केला पत्नीचा खून
तेलखेडी गावातील घटना
धडगाव- चुलत भावाच्या लग्नाला गेल्याच्या रागातून एकाने पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची घटना तेलखेडी येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेलखेडी येथे गणेश पुन्या पावरा (रा.सिपानपाडा) यांच्या चुलत भावाच्या लग्नात त्याची पत्नी बायसीबाई गणेश पावरा (१८) व तिचा भाऊ गणेश मोजा पावरा हे दोघे गेले होते.याकारणावरुन गणेश पुन्या पावरा यांनी तुम्ही लग्नाला का गेले? तुम्हाला मारुन टाकेन अशी धमकी दिली.त्यानंतर गणेश पावरा यांने दि.१४ जुन रोजी पहाटे ३ वाजता यावरून वाद घालुन पत्नी बायसीबाई गणेश पावरा (१८) हिला लाथाबुक्क्यांनी काठीने बेदम मारहाण करून तिचा खून केला.याप्रकरणी मयताच्या भाऊगणेश मोजा पावरा (रा.कात्री) याने दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोसली राहुल भदाणे करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प