सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

न्याहली गावाजवळ अवैध दारुची वाहतूक करणारा कंटेनर पकडला

१ कोटी १४ लाखांचा. मुद्देमाल जप्त उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Nandurbar. MH
  • Jun 14 2022 3:23PM


१ कोटी १४ लाखांचा. मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नंदुरबार- नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर न्याहली गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून अवैध दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पकडले.याप्रकरणी १ कोटी १४ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर कंटेनर मधुन दारुची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.त्यानुसार भरारी पथकाने दि.१३ जुन रोजी दुपारी ४.३० वाजता न्याहरी गावाजवळ सापळा रचला असता समोरुन येणारे दहा चाकी कंटेनरला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल ब्लू व्हिस्कीचे २ हजार १६० बॉक्स मिळून आले.याप्रकरणी कंटेनर व दारुसह १ कोटी १४ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.संशयित रोहित जालिंदर खंदारे व अविनाश मोहन दळवे (दोघे रा.पोखरापुर ता.मोहोळ जि.सोलापुर) यांना अटक करुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय उप आयुक्त अर्जुन मोहोळ, अधीक्षक युवराज राठोड, अधीक्षक सी.बी.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक पी.जे.मेहता यांच्या पथकाने केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार