सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जात प्रमाणपत्रासाठी* *मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे*

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे*

Sudarshan MH
  • Jun 13 2022 3:34PM

नंदुरबार, दि.13 (जिमाका वृत्तसेवा): राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे  2022-2023 या शैक्षणिक वर्षांत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र  समितीकडे अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज सादर केल्यानंतर 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी‍ मिळावा, जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहून नये म्हणून ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केला नाही. 

अशा अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषदेसमोर, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावे,असे आवाहन प्राची वाजे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ,नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार