सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दुर्गमभागातील सर्पदंशाचे मृत्यू थांबेना* *तरंगत्या दवाखान्यांचा

नंदुरबार- अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा खोऱ्यात

Nandurbar.MH
  • Sep 5 2020 9:21PM
       सुदर्शन न्युज. केतन रघुवंशी नंदुरबार- अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा खोऱ्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे  आणि  पूरस्थिती मुळे सर्पदंशाचे प्रमाण वाढलेले असतांना दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील प्रभावी उपाय उपलब्ध नाहित. परिणामी सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. जिल्हा आरोग्य केंद्र  ज्यांच्यावर  लाखो रुपये खर्ची टाकते  त्या नर्मदा काठावरील तरंगते दवाखान्यांचा ऊपयोग काय? असा प्रश्न संतप्त आदिवासी ग्रामस्थ करू लागले आहेत.
   अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा खोऱ्यातील बाधित क्षेत्रातील चीमलखेडीच्या बुराडीपाडा येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी दिवाल्‍या लिहा वसावे हा सत्तर वर्षीय वृद्ध सागाच्या झाडावर पाने तोडण्यासाठी चढलेला असताना झाडावर बसलेल्या सर्पाने त्यांच्या हातावर आणि तोंडावर दंश केला. परंतु या वृद्धाने तंत्र मंत्र विधी करून आपल्यावर उपचार करून घेतला. दिनांक 28 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. तंत्र-मंत्र व पारंपारिक उपचारांवर विश्वास असल्याने या भागात असे मृत्यू होत असतात. गेल्या जून महिन्यातही चिमलखेडी येथील बुराडीपाड्यात एका बालकाला सर्पदंशामुळे जीव गमवावा लागला होता. दुर्गम भागातील बहुतांश गाव पाड्यांमध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे परंतु त्या भागातील आरोग्य केंद्रांकडे सर्पदंशावरील पुरेसे औषध उपलब्ध नसते. मोलगी येथील रुग्णालयात यादृष्टीने खास सोय करण्यात आली होती परंतु तीसुद्धा निकामी ठरत आहे. नर्मदा काठावरील परिसरात तरंगता दवाखाना कार्यरत आहे. त्यावर कोटी रुपये खर्च होत असतात मात्र सर्पदंशाच्या रुग्णाला तेथूनही वेळीच उपचार मिळत नसल्याने नाहक जीव गमवावा लागतो, असे त्या भागातील आदिवासी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सर्पदंशाने  होणारे मृत्यू रोखण्यासाठी नर्मदा खोऱ्यातील गाव पाड्यांवर सुविधा होणे अत्यंत गरजेचे असून या ठिकाणी असलेल्या नागरिकांना त्याबाबत योग्य प्रशिक्षण व उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार