सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बारी गावात वनविभागाच्या पथकावर दगडफेक, गाडीच्या फुटून एक जखमी

पथकावर दगडफेक, गाडीच्या फुटून एक जखमी

Nandurbar. MH
  • Jun 10 2022 3:26PM


बारी येथील चौघांवर गुन्हा दाखल

नवापूर- तालुक्यातील बारी गावात जमावाने वनविभागाच्या पथकावर दगडफेक केल्याने वनविभागाच्या पथकातील गाडीच्या काचा फुटून एक कर्मचारी जखमी झालआहे.याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.अवैध लाकुड जप्त करुन घेऊन जात असताना हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुप्त माहिती च्या आधारे वनविभागाच्या पथकाने बारी गावातील कमलेश बुध्या कोकणी यांच्या घरी धाड टाकली.यावेळी झडतीत अवैध सागाचे ३ चौपाट,फाटक, एक मशिन असा एकूण ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन घेऊन जात असताना गावातील जमावाने पथकाची गाडी अडवली.यापैकी अज्ञात इसमाने दगडफेक केल्याने गाडीच्या काचा फुटून कर्मचारी बिलाल रहेमान शाह हे जखमी झाले आहेत. यावेळी सहा.वनसंरक्षक धनंजय पवार यांनी जमावाची समजूत काढून जप्त मुद्देमाल आगारात जमा केला जखमी कर्मचारी यांच्या वर नवापूर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर कारवाई सहा.वनसंरक्षक धनंजय पवार, नवापूर च्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल,वनपाल सुनीता पाटील, वनरक्षक कल्पेश अहिरे, तुषार नांद्रे, भानुदास वाघ, बिलाल शाह, कमलेश वसावे,कीसन वसावे, अरविंद पवार, प्रतिभा पवार, पूनम सोनवणे, नयना हडसर,एस.एस.तुंगार,चामाऱ्या गावीत, दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार