सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीजी पार्कमध्ये दोन ठिकाणी घरफोडी,दिड लाखाचा ऐवज चोरी परिसरात भिंतीचे वातावरण

दिड लाखाचा ऐवज चोरी परिसरात भिंतीचे वातावरण

Nandurbar. MH
  • Jun 10 2022 3:15PM

नंदुरबार- शहरालगतच्या पातोंडा शिवारातील श्रीजी पार्कमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पातोंडा शिवारातील श्रीजी पार्कमध्ये राहणारे चेतन हर्षद जोशी यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडुन अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करुन ५० हजार रुपये रोख व ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, सोन्याचे कानातले कर्णफुले असा एकूण १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. त्यानंतर चोरट्यांनी पवन विजय येपुरे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला.त्यांच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडुन गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून १४ हजार रुपये रोख व ४ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकूण १८ हजार रुपयांचा   मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.या दोन्ही घरफोडीचा घटनेत १ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी चेतन हर्षद जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस उप निरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार