सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलीस स्टेशन निहाय मदत व पोहणाऱ्या व्यक्तींचे पथक तयार करावे

*जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या पोलीस विभागास सूचना

Nandurbar. MH
  • Jun 9 2022 3:35PM


 नंदुरबार, दि.9 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या मान्सून काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस स्टेशननिहाय आपत्कालीन मदत पथक व पोहणाऱ्या व्यक्तींचे पथक  तयार करावे, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने पोलीस  विभागास दिल्या आहेत.

जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, तालुकास्तरावरील पोलीस स्टेशननुसार आपत्कालीन मदत व पोहणाऱ्या व्यक्तींच्या पथक तयार करुन त्यापथकाची माहिती जिल्हाधिकारी तसेच तहसिल कार्यालयास सादर करावी. आपत्ती काळात येणारे महत्वाचे संदेश वायरलेसद्वारे प्रसारीत करण्यात येवून त्वरीत जिल्हाधिकारी कार्यालयास आपत्तीची माहिती कळवावी.

 तात्काळ प्रतिसाद दल (क्यूआरटी) टीमला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( एनडीआरएफ) पथकाकडून शोध व बचावाचे प्रशिक्षण देण्यात यावेत. आपत्तीकाळात प्रथम  प्रतिसादकर्ता म्हणून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आपत्तीकाळ 24 x 7 शोध व बचावाची टीम, तात्काळ प्रतिसाद दलाची टीम तयार ठेवावी. आपत्तीकालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादर देण्याकरीता अत्यावश्यक शोध व बचाव साहित्य पोलीस स्टेशनला उपलब्ध होईल यासाठी नियेाजन करावे. राज्य राखीव विभाग, धुळे यांनी मोठी आपत्ती उद्भवल्यास अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्यास संदेश प्राप्त होताच तत्काळ घटनास्थळावरील पोहचण्याचे नियोजन करावे. होमगार्ड विभागाने आपत्तीकाळात आपले कडील टीम तयार ठेवावी यासाठी रंगीत तालीम तीन महिन्यातून एकदा घेऊन कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. 

प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. नोंदणीकृत रुग्णवाहिकांच्या चालकांचे संपर्क क्रमांक व गाडी क्रमांकाची माहिती आपत्ती व्यवस्थानास द्यावी. आपत्तीकाळात स्थलांतरासाठी वाहने उपलब्ध होती याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. आपत्ती काळात उपयोगात येणारे वाहने, अवजारे यांच्या मालकांचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती तयार ठेवावी.

राज्य परिवहन विभागाने आपत्तीकाळात आवश्यक बसेस उपलब्ध करुन द्यावे. आपत्तीकाळात करावयाचे मदत कार्यप्रणाली जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरु राहील यांची दक्षता घ्यावी.अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा मनीषा खत्री यांनी याविभागास दिल्या आहेत. 
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार