दोन हॉटेलमध्ये वीज चोरी उघड अक्कलकुवा येथील प्रकार
वीज चोरी उघड अक्कलकुवा येथील प्रकार
अक्कलकुवा - खापर व वाण्याविहीर येथील हॉटेल मध्ये ४१ हजार रुपयांची विज चोरी केल्याची प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाण्याविहीर येथील हॉटेल जनता मध्ये तनसुख गोवर्धन शर्मा यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून अनधिकृत पणे १० हजार ६९० रुपयांची ७३२ युनिट विजेची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दुसऱ्या घटनेत खापर-अक्कलकुवा रस्त्यावर ५ स्टार हॉटेल मेवात हरियाणा येथे अ.करीम आ.लतीफ बलोच (रा.खापर) याने ३० हजार ५५० रुपये किंमतीची ७५० युनिट विजेची चोरी केल्याची तपासणीत निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी भरारी पथकाचे अति.कार्य.अभियंता बकुळ मानवटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प