सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारला 30 पर्यंत शाळा,मंदिरे बंदच; हॉटेली, दुकाने, प्रवासीगाड्यांना मुभा

नंदुरबार जिल्हा कार्यक्षेत्रात हाँटेल्स, दुकाने, कार्यालये

Nandurbar MH
  • Sep 2 2020 10:34AM
    सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी) : नंदुरबार जिल्हा कार्यक्षेत्रात हाँटेल्स, दुकाने, कार्यालये रात्री 7 पर्यंत सुरु ठेवणे, दुचाकीवर डबलसीट जाणे, खासगी प्रवासी वाहतूक करणे अशी मुभा दिली आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट आणि मंदिरे, प्रार्थनास्थळे मात्र बंदच राहणार आहेत. तथापि ऑनलाईन शिक्षणास परवानगी  देण्यात आली आहे.
मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत काही शिथीलतेसह लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज निर्गमित केले. विविध बाबीसाठी दिलेली मुभा प्रतिबंधीत क्षेत्र वगळता आहे. आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स मधील ) बार, सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा  बंद राहतील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरू राहील.
सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषद बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी दारु,पान,तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई असेल. सर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्व सामान्यासाठी बंद राहतील, तथापि तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबधीत धर्मगुरु, पुजारी यांना करता येईल. 65 वर्षांवरील व्यक्ती,गर्भवती महला, 10 वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.
2 सप्टेंबर पासून काही बाबींना अनुमती देण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता ई-पासची गरज लागणार नाही, खाजगी बस व मिनी बस,इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतूकीसाठी  मुभा असेल. सर्व हॉटेल व लॉजिग सुरु करण्यास परवानगी असेल, तथापि शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. बाह्य शारिरीक क्रियाकलाप करणेस कोणतेही बंधन असणार नाही.
टॅक्सी,कॅब,ॲग्रीगेटर यांना वाहनचालक व इतर तीन प्रवासी, रिक्शासाठी वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी, चारचाकी वाहनासाठी  वाहनचालक व इतर तीन प्रवाशांना केवळ अत्यावश्यक बाबीसाठी अनुमती असेल. दुचाकी वाहनावर चालक आणि सहप्रवाशास अनुमती असेल. दूचाकीवर  मास्क आणि हेल्मेट घालणे आवश्यक राहील. प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करणेस मनाई आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर खुले लॉन्स, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत (संपूर्ण कार्यक्रमासाठी) लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाच्या आयोजनासाठी परवानगी घेणे आवश्यक राहील. अंत्यविधी सारख्या कार्यक्रमास 20 व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन परवानगी असेल.
 इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे. केश कर्तनालय, स्पा, सलून आणि ब्युटी पार्लरला शासनाने दिलेल्या अटी व शर्ती  तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या 27 जून रोजीच्या आदेशाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी असेल, असे आदेशात म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार