सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बालिकेवरील बलात्काराने नंदुरबारला खळबळ* *लाठीमार करीत 21 जणांवर गुन्हा दाखल*

नंदुरबारला खळबळ* *लाठीमार करीत 21

Nandurbar MH
  • Sep 1 2020 6:49PM
      सुदर्शन न्यूज केतन रघुवंशी.नंदुरबार- अवघ्या तीन वर्षीय लहानग्या बालिकेवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना ऊघडकीस आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. दरम्यान मुलीच्या संतप्त नातलगांवर आणि चित्रकथी समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे संतप्त भावना उमटू लागल्या आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील वाघोदे शिवारात राहणाऱ्या कालिया ठाकरे नामक तरुणाने त्याच गावातील हसत्या खेळत्या लहानग्या तीन वर्षीय मुलीला आपल्या वासनेचे लक्ष बनवले. दिनांक 31 ऑगस्ट रोजी भरदिवसा सकाळी 11 वाजता संधी साधून त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या घरच्यांना घडलेला प्रकार लक्षात येताच नंदुरबारला त्यांनी धाव घेतली. मुलीला रक्तरंजित अवस्थेत नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. फिर्याद दाखल करून घेत निरीक्षक भापकर यांनी ताबडतोब तपास करून काल्या ठाकरे यास अटक करून गुन्हा नोंदवला. न्यायालयाने त्यास आज सोमवार रोजी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान चित्रकथी समाजातील संतप्त कार्यकर्ते आणि बालिकेचे नातलग समूहाने जिल्हा रुग्णालयात गेले तेव्हा कोरोना चे कारण सांगून त्यांना अडवण्यात आले. शाब्दिक चकमक उडाल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत त्यांना हुसकावून लावले. याविषयी चित्रकथी समाजातून निषेध करणाऱ्या संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार