मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेला पाजले विषारी औषध* *पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
नंदुबार - मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेला
सुदर्शन न्युज केतन रघुवंशी .नंदुबार - मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेला तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी हात-पाय बांधून पिकप फवारणीचे विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहितेला उपचारार्थ धुळ्यात दाखल केले असून 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील नगाव येथे मनीषा दिलीप सूर्यवंशी या 22 वर्षीय विवाहितेने 28 ऑगस्ट 2020 रोजी फिर्याद नोंदविल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या विवाहितेने म्हटल्यानुसार मूलबाळ होत नाही म्हणून तिचा वारंवार छळ केला जात होता. याच कारणाने दिनांक 26 ऑगस्ट रोजी कमलाबाई सूर्यवंशी यांच्या नगाव येथील शेतात तिचा पती दिलीप वेडू सूर्यवंशी, सासरे वेडू महारू सूर्यवंशी, कमलाबाई वेडू, कृष्णा वेडू, ज्योती कृष्णा, अशोक वेडू, सुरेखा वेडू या सर्वांनी मनीषा दिलीप सूर्यवंशी या विवाहितेला मारहाण केली आणि तिचे हात-पाय बांधून पीक फवारणीचे विषारी औषध बळजबरी पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अत्यवस्थ स्थितीत मनीषा सूर्यवंशी यांच्यावर नंदुरबार येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचार करण्यात आले त्यानंतर तातडीने धुळे येथील रुग्णालयात 28 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी जबाब घेतले असता वरील घटना या विवाहितेने कथन केली आणि त्यावरून फिर्याद नोंदवून घेत सूर्यवंशी परिवारातील वरील सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प