सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात मनसेने जोरदार आवाजात म्हटली हनुमान चालीसा नंदुरबार ः- मशीदींवरील भोंगे काढण्याचा अल्टीमेटम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता

नंदुरबारात मनसेने जोरदार आवाजात म्हटली हनुमान चालीसा नंदुरबार

Nandurbar .MH
  • May 4 2022 4:43PM
नंदुरबारात मनसेने जोरदार आवाजात म्हटली  हनुमान चालीसा
नंदुरबार ः- मशीदींवरील भोंगे काढण्याचा अल्टीमेटम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.यापार्श्वभूमीवर काल 4 मे रोजी सकाळी प्रचंड पोलिस बंदोबस्तात शहरातील धुळे रस्त्यावरील हिंदू एकता मित्र मंडळाच्या हनुमान मंदीरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आवाजात हनुमान चालीसा पठण केली. 
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मनसे तर्फे भोंगे काढण्यासाठी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्यात येईल,असा इशारा दिला होता.त्यानुसार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, तालुका प्रमुख राकेश माळी, नंदुरबार विधानसभा अध्यक्ष सुनील कोकणी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, प्रविण जोशी, अशोक माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी काल बुधवारी सकाळी धुळे रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसा पठण केले.यावेळी शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार