सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

137 वर्ष जुन्या हरिहर भेटीला कायदा दाखवणाऱ्या पोलिसांची मशिदीतल्या गर्दीला खुली सूट का?

अवलगाझी मशिदीतील गर्दीने पोलिस प्रशासनाचा धार्मिक भेद केला

Nandurbar MH
  • Aug 29 2020 6:07PM
सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी)  : नंदुरबार- मशिदीवरील कार्यक्रमाला वेगळा न्याय आणि मानाच्या गणपतींच्या पारंपारिक हरिहर भेटीला वेगळा न्याय देऊन प्रशासनाने धार्मिक भेद करू नये.137 वर्षची परंपरा अखंडीत ठेवून नंदनागरीच्या जनतेच्या भावनांचा आदर करावा, या मागणीने जोर धरला असून हरिहर भेटीचा मुद्दा तापायला सुरुवात झाली आहे.
 फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी राहिल परंतु मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला. परंतु नंदुरबार जिल्हा प्रशासन धार्मिक परंपरांकडे मुंबई उच्च न्यायालय पेक्षाही अधिक वेगळ्या नजरेने पहात असल्याची जनभावना नंदुरबार शहरात बनली आहे. कारण गणपती विसर्जनातील 137 वर्षाची परंपरा लाभलेल्या हरिहर भेटीला सतराशे आडकाठ्या लावणाऱ्या नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने नंदुरबार शहरातील अव्वलगाझि मशीदीच्या ठिकाणी मात्र सर्व तऱ्हेच्या मुभा दिल्याचे नंदुरबार वासियांना पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्स पाळून हरिहर भेट साजरी करायला गणेश भक्त तयार असतानासुद्धा प्रशासनाने केवळ गर्दी होऊ नये म्हणून परवानगी नाकारत हरिहर भेटीच्या उज्वल परंपरेला खंडित करण्याची भूमिका घेतली. परिणामी 137 वर्षानंतर प्रथमच हरिहर भेट खंडित होणार आहे. गणेशभक्तांसाठी ही दुःखद घटना आहे. मग अव्वल गाजी जवळील गर्दीी पोलिसांना का दिसली नाही? त्यांना परवानगी कशी देण्यात आली? असे प्रश्न उपस्थित करून अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. मानाच्या दादा व बाबा गणपतींच्या हरीहर भेटीला सर्व आचारसंहिता लागू केली जाते. मात्र अव्वलगाझि मशीदीच्या ठिकाणी सर्वत्र मुक्त संचार करू दिला जातो. मंडळांना साध्या म्युझिक सिस्टमला परवानगी मिळत नाही. मात्र हाती आलेला व्हिडिओ पाहिला असता अवल गाझी मशिदीमध्ये त्यांचे भोंगे सर्रास सुरू दिसतात. एकीकडे प्रशासनाने दादा-बाबा ची लाईटिंग काढावयास लावली, मात्र दुसरीकडे मशिदीवरील जबरदस्त लाइटिंग सुरु असल्याचेे पाहायला मिळाले. गणेश मंडळांना 4हून अधिक लोक पूजेला जमवले म्हणून नोटीस बजावली जाते परंतु त्याच वेळी अवल गाझी मशिदीमध्ये शेकडोंची गर्दी जमल्यावरही प्रशासन दखल घेताना दिसले नाही. कायदे नियम आणि प्रशासनाने काढलेले आदेश सर्वांना समान असतात मग त्यांचीी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अंमलबजावणी करताना धार्मिक भेद का केला? असा संतापजनक प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. स्थानीय प्रशासन नियम लावून आमच्या भावनांशी खेळ करीत आहे, अशी भावना गणेशभक्तांनी मांडली असून महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रका नुसारच मानाचे दादा-बाबा गणपतींची हरीहर भेट होऊ द्यावी, कोणतेही नियमाचे उल्लंघन न करता हे सर्व शक्य आहे, असे आग्रही मत मांडणे सुरू केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार